गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

Gujarat Titans Wins IPL 2022: आयपीएल (IPL) 2022 चे ‘टेबल टॉपर्स’ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सविरुद्ध करून दाखवलं. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या सीझनमधून आयपीएलच्या (IPL) रिंगणात उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने स्पर्धेचे 7 विकेटने जेतेपदाचा सामना जिंकला आणि पहिले-वहिले विजेते राजस्थान रॉयल्सच्या स्वप्न धुळीस मिळवले. या विजयासह गुजरात इंडियन प्रीमियर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात जेतेपद काबीज करणारा फक्त दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी त्यांचे प्रतिस्पर्धी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 2008 मध्ये दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वात हा पराक्रम केला होता. त्यावेळी रॉयल्ससमोर एमएस धोनीचे सुपर किंग्स होते. त्यानंतर कोची टस्कर्स, पुणे सुपर जायंट्स आणि गुजरात लायन्स यांनी आयपीएलमध्ये पाऊल ठेवले, परंतु यापूर्वी पदार्पणात कोणताही संघ राजस्थानच्या कामगिरीची बरोबरी करू शकला नाही. (IPL 2022 Final: राजस्थानचा ‘क्लीन स्वीप’, 7 गडी राखून विजय मिळवत गुजरातने जिंकले पहिले जेतेपद; 5 वर्षांनंतर IPL ला मिळाला नवा चॅम्पियन)

दुसरीकडे, आयपीएलचा किताब जिंकणारा गुजरात ही सातवी फ्रँचायझी ठरली आहे. मुंबई इंडियन्स पाच जेतेपदासह आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. तर धोनीच्या नेतृत्वात सुपर किंग्स चार वेळा आयपीएल चॅम्पियन बनले आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा विजयाची चव चाखली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि राजस्थानने 1-1 वेळा जेतेपद जिंकले आहे.या सामन्याबद्दल बोलायचे तर संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हार्दिक पांड्या, ज्याने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही छाप पाडली. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्याच अंगी उलटला. गुजरात टायटन्सच्या घातक गोलंदाजीसमोर संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 130 धावा करता आल्या. यादरम्यान हार्दिकने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 11 चेंडू बाकी असताना लक्ष्याचा पाठलाग केला. शुभमन गिलने नाबाद 45, मिलरने नाबाद 32 आणि हार्दिकने 34 धावा केल्या.

19व्या षटकांत मॅकॉयच्या पहिल्याच चेंडूवर गिलने स्क्वेअर लेगच्या दिशेने शानदार षटकार ठोकत संघाला विजेतेपद मिळवून दिले. सामन्याच्या सुरुवातीला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 षटकांत 130/9 या छोट्या धावसंख्येवर डाव संपवला. दुसऱ्या डावात डेविड मिलरसह शुभमन गिलने गुजरातचा खेळ संपवला आणि 11 चेंडू शिल्लक असताना उर्वरित धावांचा यशस्वी पाठलाग केला. गिलने नाबाद 45 धावा केल्या, तर मिलरने 19 चेंडूत 35 धावा ठोकून गुजरातच्या झोळीत पहिले विजेतेपद पाडले.