IPL 2022, DC vs MI: रोमांचक सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा ने व्यक्त केली निराशा, म्हणाला- ‘हा शेवट नाही’
मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2022 च्या पहिल्या दुहेरी हेडर सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऋषभ पंतने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत रोहितच्या मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंतचा निर्णय सुरुवातीला संघासाठी योग्य ठरला नसला तरी मात्र 177 धावांचे आव्हान दिल्लीने 4 गडी राखून सध्य केले. या दरम्यान या संपूर्ण सामन्यात पकड घेऊनही मुंबई इंडियन्सने हा सामना गमावला. पहिल्या सामन्यात मुंबईच्या दारुण पराभवात ईशान किशन याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सुरुवातीच्या विकेट गमावल्याचे पाहून हा सामना हिटमॅनच्या संघाने एकतर्फी जिंकणार असल्याचे दिसत होते. पण अखेरीस ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या फलंदाजीने सामन्याचा निकाल बदलला व दिल्लीला पराभवापासून वाचवले. (IPL 2022, MI vs DC: मुंबई इंडियन्ससाठी पहिले पाढे पंचावन्न; चुरशीच्या सामन्यात दिल्ली 4 विकेटने विजयी, रोहितच्या ‘पलटन’ला 10 वा ओपनिंग झटका)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या या पहिल्या पराभवानंतर सामन्याच्या सादरीकरणाबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला वाटले की ही चांगली धावसंख्या आहे. ही अशी खेळपट्टी नव्हती जिथे तुम्ही 170 च्या जवळपास धावा कराल. पण आमच्या संघाने चांगली फलंदाजी केली. याचा अर्थ हा पहिला किंवा शेवटचा सामना होता असे नाही, आम्हाला फक्त सामना जिंकायचा होता. या मोसमातील हा पहिलाच सामना होता. यातून आपण खूप काही शिकलो. जरी ते आमच्यासाठी निराशाजनक असले तरीही. फक्त एक संघ म्हणून जवळ राहून शिकण्याची गरज आहे. पराभवाने निराश झालो पण शेवट नाही.” मुंबईला स्लो स्टार्टर्स म्हणून ओळखले जाते पण ते अनेकदा मागून परत येतात आणि बाद फेरीपर्यंत पोहोचतात.

लक्षात घ्यायचे की रोहितच्या ‘पलटन’ने 2013 पासून आतापर्यंत 5 विजेतेपदे जिंकली असून ते तेव्हापासून ते आपला सलामीचा सामना जिंकू शकलेले नाही. ईशान किशनने अवघ्या 49 चेंडूत 81 धावा ठोकल्या तर रोहितने स्वतः 41 धावा केल्या. नवीन-नियुक्त टायमल मिल्स याने ऋषभ पंतची मोठी विकेट घेतली. तथापि मुंबई इंडियन्स विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अक्षर आणि ललित यांना पालटला. उल्लेखनीय आहे की मुंबई इंडियन्सचा सलामीच्या सामन्यातील हा सलग 10 वा पराभव ठरला आहे.