
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंची बोली सुरू आहे. आयपीएल मेगा लिलावाच्या (IPL Mega Auction) पहिल्या दिवशी मार्की खेळाडूंची बोली लागली, ज्यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन, डेविड वॉर्नर, आर अश्विन, पॅट कमिन्स (Pat Cummins) यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंवर बोली लागली. काहींना बंपर फायदा झाला तर काहींसाठी हा नुकसानीचा सौदा ठरला. मार्की खेळाडूंच्या यादीत, स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) प्रथम बोली लावली आणि त्याला बंपर फायदा झाला आहे. तर पॅट कमिन्स मागील लिलावाच्या तुलनेत अर्ध्या किमतीत विकला गेला. तसेच श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार असून तो संघाचा कर्णधार बनू शकतो अशीही अपेक्षा आहे. 10 मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा ठरला आहे. (IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर KKR ने केली पैशांची बरसात, 12.25 कोटींत केले खरेदी; कोलकाताच्या कर्णधारचा प्रश्न सुटला?)
पाहा या 10 खेळाडूंची नावे आणि किंमती-
श्रेयस अय्यर, कोलकाता नाइट रायडर्स, 12.25 कोटी
कगिसो रबाडा, पंजाब किंग्ज, 9.25 कोटी
शिखर धवन, पंजाब किंग्ज, 8.25 कोटी
ट्रेंट बोल्ट, राजस्थान रॉयल्स, 8 कोटी
पॅट कमिन्स, कोलकाता नाईट रायडर्स, 7.25 कोटी
फाफ डु प्लेसिस, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 7 कोटी रुपये
क्विंटन डी कॉक, लखनौ सुपर जायंट्स, 6.75 कोटी
मोहम्मद शमी, गुजरात टायटन्स, 6.25 कोटी
डेविड वॉर्नर, दिल्ली कॅपिटल्स, 6.25 कोटी
आर अश्विन, राजस्थान रॉयल्स, 5 कोटी
तसेच एकूण लिलावाबद्दल बोलायचे तर श्रेयस अय्यर हा लिलावात आतापर्यंतचा सर्वात महागडा ठरला आहे, त्याला KKR ने 12 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. त्यानंतर हर्षल पटेल 10 कोटी 75 लाख रुपयांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या ताफ्यात परतला आहे. तसेच पंजाब किंग्जने शिखर धवनला 8 कोटी 25 लाख, राजस्थान रॉयल्सने रविचंद्रन अश्विनला 5 कोटी आणि पॅट कमिन्सला KKR ने 7.25 कोटी रुपयांना खरेदी केले. इतकंच नाही तर Mr IPL सुरेश रैना, ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर यांना पहिल्या दिवशी लिलावात खरेदीदार मिळाला नाही.