IPL 2022 Retention Rules: आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझी किती खेळाडूंना करू शकते रिटेन, नवीन नियमावली उघड
विराट कोहली व इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

IPL Auction 2022 Retention Rules: आयपीएल (IPL) 2022 साठी खेळाडूंचा लिलाव हा सर्वात मोठा आणि विशेष लिलाव असण्याचे अपेक्षित आहे. ही स्पर्धा पुढील वर्षांपासून 8 संघांमधून 10 संघांची होणार आहे. लखनौ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) फ्रँचायझीही आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय या मेगा लिलावात जवळपास सर्वच खेळाडू लिलावात विक्रीसाठी उपलब्ध असतील. दरम्यान ESPNcricinfo च्या वृत्तानुसार आयपीएल प्रशासक आणि सर्व फ्रँचायझी संघांमध्ये झालेल्या बैठकीत या मोठ्या लिलावाबाबत काही नियमांवरही सहमती झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानुसार जुने 8 संघ त्यांच्या सध्याच्या पथकातील चार खेळाडूंना रिटेन करू शकते. तसेच दोन्ही नवीन संघ लिलावापूर्वी कायम ठेवलेल्या खेळाडूंव्यतिरिक्त विद्यमान पर्यायांमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्यास सक्षम असतील. यादरम्यान राईट टू मॅच हा पर्याय दिला जाणार नाही. (IPL 2022 मेगा लिलावात 3 फ्रँचायझी David Warner वर लावू शकतात दाव, ‘हा’ संघ मारू शकतो एका दगडात दोन पक्षी)

बजेट किंवा पर्सबद्दल बोलायचे तर प्रत्येक संघाचे अंदाजे 90 कोटी रुपयांचे बजेट असू शकते, जे आयपीएल 2021 च्या लिलावापेक्षा 5 कोटी जास्त असेल. इतर नियमांबद्दल बोलायचे तर या अहवालानुसार सर्व संघ दोन संयोजनांसह चार खेळाडूंना त्यांच्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये तीन भारतीय असतील आणि एका परदेशी खेळाडूला कायम ठेवता येईल. किंवा इतर संयोजनानुसार त्यानुसार ते दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकतात. येथे ज्या तीन भारतीय खेळाडूंबद्दल बोलले जात आहे ते कॅप्ड, अनकॅप्ड किंवा या दोघांचे संयोजन देखील असू शकतात. जर एखाद्या संघाने आपला कोणताही खेळाडू रिटेन केले नाही तर तो लिलावात जातो. जर दुसऱ्या संघाने त्या खेळाडूला लिलावात विकत घेतले, तर त्याच्या जुन्या संघाला तेवढीच रक्कम देऊन (इतर संघाने विकत घेतल्याप्रमाणे) खेळाडूला पुन्हा संघात समाविष्ट करण्याचा पर्याय यापूर्वी उपलब्ध होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

या अहवालात पुढे म्हटले आहे की प्रत्येक खेळाडूला फ्रँचायझी सोबत राहायचे आहे की नाही किंवा त्याला आयपीएल लिलावात जायचे आहे की नाही आणि संघांना त्याला पुन्हा खरेदी करण्याची संधी द्यायची आहे की नाही हे ठरवण्यासाठी पूर्ण सूट मिळेल. तथापि आयपीएल लिलावाची तारीख किंवा रिटेंशनची अंतिम मुदत अद्याप जाहीर झालेली नाही. पण खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत नोव्हेंबरअखेर असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.