IPL 2021 in UAE: आयपीएल (IPL) 2021 पुन्हा सुरू होण्यास महिनाभराचा अवधी शिल्लक आहे आणि उत्साह शिगेला पोहचला आहे. स्पर्धा स्थगित होण्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने टेबलच्या शीर्षस्थानी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यापेक्षा दोन गुणांनी आघाडी मिळवली होती. तसेच मुंबई इंडियन्सने 7 सामन्यात 8 पॉईंट्स मिळवत टॉप 4 मध्ये स्थान मिळवले, तर सनरायझर्स हैदराबाद 7 सामन्यात फक्त 2 पॉइंट्स मिळवून टेबलच्या तळाशी बसले होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, आयपीएलचे पुनरागमन बर्याच संघांसाठी अपेक्षांचे ओझे देखील घेऊन येईल, या दबावाचा सिंहाचा वाटा या संबंधित संघाच्या कर्णधारांवर असेल. स्वाभाविकच, आयपीएलच्या अनेक कर्णधारांवर स्पर्धेच्या पुन्हा सुरू होण्याच्या टप्प्यावर प्रचंड दबाव असेल. आणि टी-20 देखील युएई (UAE) येथेच होणार असल्यामुळे कर्णधारांवर एक लीडर म्हणून आपला दम दाखवण्याची मोठी संधी असेल. (IPL 2021 in UAE: 15 कोटीत खरेदी केलेल्या KKR च्या पॅट कमिन्सच्या जागी बदली म्हणून ‘हे’ 3 आहेत अव्वल दर्जाचे पर्याय)
विराट कोहली (Virat Kohli)
या यादीत आघाडीवर सर्वात पहिले नाव येथे ते आरसीबी कर्णधार विराट कोहलीचे. 2021 च्या आवृत्तीत त्याने 7 सामन्यांमध्ये 121.47 च्या स्ट्राइक रेटने फक्त 198 धावा केल्या. शिवाय, कर्णधार म्हणून कोहलीची क्षमता देखील चर्चेत राहिली आहे. जरी तो प्रमुख फलंदाजांपैकी एक असला तरी त्याच्या कर्णधारपदाबद्दल नेहमीच असे म्हटले जात नाही, विशेषत: व्हाईट-बॉल क्रिकेट आणि आयपीएलमध्ये. शिवाय टी-20 वर्ल्ड कप जवळ येत असताना, कोहली सर्व गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी वैयक्तिक लढाई लढण्यासाठी सज्ज असेल. आणि जर असे घडले तर विराट कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये आपली छाप सोडू शकतो.
एमएस धोनी (MS Dhoni)
2020 आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळून देण्यात अपयशी ठरलेला एमएस धोनीचे नाव देखील या यादीत सामील आहे. सध्या संघ गुणतालिकेत मजबूत स्थितीत आहे, पण फलंदाज म्हणून धोनी ठसा उमटवू शकला नाही. त्याने 7 सामन्यांमध्ये फक्त 37 धावा केल्या. अशा प्रकारे, धोनी - फलंदाज, आयपीएल 2021 मध्ये स्पष्टपणे दबावाखाली असेल. तसेच सीएसकेच्या दृष्टीकोनातून, आयपीएल 2021 ही फ्रँचायझीसाठी धोनीच्या नेतृत्वात विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची अंतिम संधी असू शकते. 13 शानदार वर्षांच्या सेवेनंतर धोनीकडे सिद्ध करण्यासाठी काहीच उरले नाही. तरीही धोनी आपल्या संभाव्य अखेरच्या आयपीएलमध्ये विजेतेपदासह निवृत्त होण्याच्या प्रयत्नात असेल.
इयन मॉर्गन (Eoin Morgan)
आयपीएल 2020 च्या मध्यभागी दिनेश कार्तिक कर्णधार म्हणून पायउतार झाला आणि इंग्लिश वर्ल्ड कप विजेता इयन मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. मॉर्गन, आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून यश मिळवूनही, आयपीएलमध्ये अद्याप त्याची पुनरावृत्ती करू शकला नाही. नाईट रायडर्सची फलंदाजी, विशेषतः, मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघाकडून कोणी काय अपेक्षा करेल अशी राहिली नाही. वैयक्तिकही मॉर्गन जास्त नशीबवान ठरला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही, मार्गनला 2021 मध्ये संघर्ष करावा लागत आहे आणि फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये थ्री लायन्सने भारताचा दौरा केला तेव्हा त्याने क्वचितच छाप पाडली. त्यानंतर आयपीएलमधेही मॉर्गनने 7 सामन्यांत केवळ 92 धावा केल्या. त्याच्याकडे गोष्टी फिरवण्याची क्षमता असली तरी तो कर्णधार म्हणून दबावाखाली असेल हे तथ्य नाकारता येत नाही.