पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार सुरुवात करणाऱ्या नॅथन एलिसला पंजाब किंग्सने आगामी आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी बदली खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. झे रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ यांनी युएई येथे आयोजित होणाऱ्या आयपीएलमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा नंबर एक वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स  (Pat Cummins) देखील आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मामुळे स्पर्धेत सहभाग घेणार नाही आहे. कमिन्सने यापूर्वीच याबाबत घोषणा केली होती. कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) कमिन्सला आयपीएल लिलावात तब्ब्ल 15 कोटींचा खर्च करत संघात सामील केले होते. कमिन्सने पहिल्या टप्प्यात बॉलसह बॅटने देखील काही महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्यामुळे आता त्याचा बदली म्हणून केकेआर (KKR) फ्रँचायझीकडे तीन गोलंदाज आहे ज्यांचा ते अव्वल दर्जाचे पर्याय म्हणून विचार करू शकतात.

शेल्डन कॉटरेल (Sheldon Cottrell)

वेस्ट इंडिजचा 31 वर्षीय डावखुरा गोलंदाज कॉटरेलने आयपीएलच्या मागील हंगामात सर्वांना प्रभावित केले होते. पण यांदाच्या लिलावात त्याला खरेदीदार मिळाला नाही. नवीन चेंडूने विकेट घेण्याची कॉटरेलची क्षमता त्याला आयपीएल 2021 फेज 2 साठी केकेआर फ्रँचायझीसाठी योग्य पर्याय बनवू शकते. कॉटरेलने 2020 मध्ये पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केले. जमैकन गोलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या 6 आयपीएल सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 32 टी-20 मध्ये 42 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम साऊदी (Tim Southee)

न्यूझीलंडच्या सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक, 32 वर्षीय साऊदी कमिन्सच्या जागी योग्य बदली गोलंदाज सिद्ध होऊ शकतो. कोणत्याही स्थितीत चेंडू स्विंग करण्याची साऊदीची क्षमता त्याला नवीन चेंडूने घातक बनवते. साऊदीने आतापर्यंत खेळलेल्या 80 सामन्यांमध्ये 99 टी-20 विकेट्स काढल्या आहेत.

बिली स्टॅनलेक (Billy Stanlake)

ऑस्ट्रेलियन स्पीडस्टार बिली स्टॅनलेकला क्रिकेट जगतात कोणत्याही परिचयाची गरज नाही. स्टॅनलेक कमिन्ससाठी परिपूर्ण बदली ठरू शकते कारण 6 फूट 8 इंच स्पीडस्टरला आयपीएलचा अनुभव आहे. यापूर्वी, स्टॅनलेक सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळला आणि 6 आयपीएल सामन्यांमध्ये खेळला ज्यामध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या. याशिवाय स्टॅनलेकने 19 टी -20 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत.