पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

IPL 2021: बायो बबलमध्ये खेळाडू कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आयपीएल (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन (Australian Players in IPL) खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी मालदीव (Maldives) वाटे मायदेशी रवाना होऊ शकतात. भारतात कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेत ऑस्ट्रेलियन सरकारने 15 मे पर्यंत देशात कडक प्रवासी बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडू माघार घेतल्यानंतर या देशातील 14 खेळाडू आयपीएलमध्ये प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचारी यांच्याखेरीज बाकी आहेत. पॅट कमिन्स (Pat Cummins), स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, रिकी पॉन्टिंग यांच्यासह अन्य भाष्यकर्ते माइकल स्लेटर देखील मालदीव येथे रवाना होऊ शकतात. ESPNCricinfo च्या अहवालानुसार, “ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांचा मोठा समूह मालदीवला रवाना होण्याची शक्यता आहे.” (IPL 2021 Suspended: आयपीएल 14 मध्ये कोण-कोण सापडले COVID-19 च्या विळख्यात, पहा युवा ते दिग्गजच खेळाडूंची संपूर्ण यादी)

यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने परिस्थितीचे अभूतपूर्व म्हणून वर्णन केले. फॉक्सच्या 'The Back Page show' वर बोलताना कमिन्स म्हणाला की, परत कधी व कसे जायचे याचा निर्णय घेण्यापूर्वी ते या विषयावरील पूर्ण स्पष्टतेची प्रतीक्षा करत आहे. कमिन्स म्हणाला, “मी पुढे ढकलणे, रद्द करण्याबाबत ऐकत आहे, कदाचित मुंबईला जात आहे, मी रिलीजची प्रतीक्षा करेन.” त्याने पुढे म्हटले की, “ही (परिस्थिती) आता प्रत्येक दोन मिनिटांत बदलत असल्याचे दिसत आहे.” ऑस्ट्रेलियातील तीन क्रिकेटपटूंनी सरकारकडून विमानसेवा थांबवण्याच्या अंतिम मुदतच्या काही तासापूर्वीच स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तर मंगळवारी आयपीएल पुढे ढकलल्यानंतर अनेक जण भारतात अडकले आहेत.

अशास्थितीत आपत्कालीन रणनीती म्हणून अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू दुबई किंवा मालदीव वाटे घरी परतण्याच्या शोधात आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाने परदेशी क्रिकेटपटूंनाही असे आश्वासन दिले की, “सर्व सहभागींच्या सुरक्षित जाण्याची व्यवस्था करण्यासाठी ते आपल्या सामर्थ्याने सर्वकाही करतील.”