IPL 2021, RR vs SRH Match 28: सनरायझर्स हैदराबादचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, SRH ने डेविड वॉर्नरला दिला डच्चू; पहा Playing XI
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

IPL 2021, RR vs SRH Match 28: आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या पर्वातील 28 व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हैदराबाद संघ आजपासून नवीन कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स विरोधात आजच्या सामन्यात हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल झाला आहे. डेविड वॉर्नरला (David Warner) कर्णधारपदावरून हटवल्यावर आता त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर केले आहे. वॉर्नरच्या जागी मोहम्मद नबीचा समावेश आहे. याशिवाय, हैदराबादने जगदीशा सुचित आणि सिद्धार्थ कौल यांनाही बाहेर केले असून त्यांच्या भुवनेश्वर कुमार व अब्दुल समदला संधी दिली आहे. (IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघात Liam Livingstone च्या जागी बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ 20 वर्षीय गोलंदाजाचा केला समावेश)

वॉर्नरला बाहेर केल्यामुळे जॉनी बेयरस्टोच्या साथीला आता करणदाहर केन विल्यमसन किंवा मनीष पांडे सलामीला येऊ शकतात. विशेष म्हणजे विल्यमसनने यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्समध्ये देखील दोन बदल पाहायला मिळत आहे. रॉयल्सने जयदेव उनाडकटला विश्रांती दिली असून शिवम दुबेला डच्चू दिला आहे. शिवाय, राजस्थानना कार्तिक त्यागीचा समावेश केला असून अनुज रावत आयपीएल डेब्यू करताना दिसणार आहे. राजस्थान-हैदराबाद संघातील आजच्या सामन्याचे आयोजन दिल्लीतील (Arun Jaitley Stadium) अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात येत आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन), अनुज रावत, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, मुस्तफिजूर रहमान आणि कार्तिक त्यागी.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: केन विल्यमसन (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, अब्दुल समद, मोहम्मद नबी, केदार जाधव, विजय शंकर, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद आणि भुवनेश्वर कुमार