IPL 2021, RR vs RCB: दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरोधात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangaloer) आपला विजयीराथ सुरु ठेवला. राजस्थानने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आरसीबीने (RCB) 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले. यासह विराट‘आर्मी’ने यंदाच्या आयपीएल प्लेऑफ फेरीसाठी तिकीट पक्के केले आहे. आरसीबीसाठी श्रीकर भरतने (Srikar Bharat) 44 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सर्वाधिक नाबाद 50 धावांचे योगदान दिले. तसेच विराट कोहलीने 25 आणि देवदत्त पडिक्क्लने 22 धावा केल्या. दुसरीकडे, या पराभवामुळे राजस्थानच्या प्लेऑफ फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सजू सॅमसनच्या रॉयल्सचा 11 सामन्यातील हा सातवा पराभव ठरला आहे. राजस्थानसाठी मुस्तफिजुर रहमानने 2 विकेट घेतल्या. याशिवाय रियान परागने विराटला धावचीत करून माघारी धाडलं. (राजस्थानविरुद्ध दमदार विजयाने RCB प्लेऑफ नजीक, RR साठी मार्ग खडतर)
राजस्थानने टॉस गमावून पहिले फलंदाजी करत 9 विकेट गमावून 149 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात विराट व पडिक्क्लची जोडी सलामीला उतरली. दोघांनी अपेक्षेप्रमाणे संघाला जोरदार सुरुवात करून दिली. आरसीबी संघाकडून सलामीवीर कोहली आणि पडिक्क्लच्या सलामी जोडीने उत्तम सुरुवात केल्यानंतर संघाच्या 48 धावांवर देवदत्त बाद झाला. पडिक्क्ल पाठोपाठ काही धावांच्या अंतरावर परागने अप्रतिम डायरेक्ट हीट करत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला धावचीत केले आणि राजस्थानला मोठा दिलासा दिला. मॅक्सवेल व भरत यांनी संघाला विजयाच्या जवळ नेले असताना पुन्हा मुस्तफिजुरने भरतला माघारी धाडलं आणि दोघांची 69 धावांची अर्धशतकी भागीदारी मोडली. पण तोवर राजस्थानसाठी खूप उशीर झाला होता. अंतिम क्षणी मॅक्सवेलने संघाला विजयीरेष ओलांडून दिली व प्लेऑफमध्ये संघाचा प्रवेश निश्चित केला. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 6 चौकार व एक षटकार लगावला.
यापूर्वी रॉयल्ससाठी एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी संघाला दमदार सुरुवात दिली होतु पात्र अन्य फलंदाजांनी साथ न दिल्याने एकेवेळी 100 धावांवर एक विकेट गमावर राजस्थान संघ फक्त 149 धावाच करू शकला. जयस्वाल 31 धावा करुन बाद झाला तर लुईसने 31 चेंडूत 51 धावा ठोकत अर्धशतक ठोकले आणि डेब्यू करणारा खेळाडू जॉर्ज गार्टनच्या चेंडूवर झेलबाद झाला. कर्णधार सॅमसनने 19 आणि क्रिस मॉरिसने 14 धावा केल्या. आरसीबीसाठी हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहल व शाहबाझ अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.