IPL 2021: RCB vs KKR सामन्यात हा कॅच ठरला आकर्षणाचा केंद्र, बनू शकतो हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल पहा Video
राहुल त्रिपाठीने घेतला विराटचा अप्रतिम कॅच (Photo Credit: Twitter)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या 10व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) 38 धावांनी पराभूत करत प्रतिष्टीत स्पर्धेत पहिल्यांदा विजयाची हॅटट्रिक साजरी केली. बेंगलोर आणि कोलकाता संघात झालेला सामना खूप रोमांचक होता आणि खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज राहुल त्रिपाठीने असे काही केले जे पाहून सर्वच आश्चर्य झाले. राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) आरसीबीच्या (RCB) डावात फिल्डिंग करताना विरोधी संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक जबरदस्त कॅच घेतला जो सामन्यात आकर्षणाचा केंद्र ठरला. सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदासाठी बेंगलोरकडून विराट आणि देवदत्त पडिक्क्ल मैदानात उतरले, पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला फटका कर्णधार विराटच्या रूपात बसला. (RCB vs KKR IPL 2021: विजयासह ‘विराटसेने’ने साधली पहिली आयपीएल हॅटट्रिक, नाईट रायडर्स विरोधात 38 धावांनी मारली बाजी)

कोहलीला 6 चेंडूत फक्त 5 धावा करता आल्या. कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला झेलबाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. आरसीबीच्या डावातील दुसरी ओव्हर टाकण्यासाठी केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने युवा फिरकीपटू चक्रवर्तीला बोलावले. ओव्हरमधील दुसरा चेंडू विराटने कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र, चेंडू योग्यपणे बॅटवर बसला नाही आणि डीप पॉईंटच्या दिशेने उडाला. पॉईंट क्षेत्रात फिल्डिंग करणाऱ्या त्रिपाठीने वेगवान धाव घेऊन सूर मारत अविश्वसनीय कॅच पकडला. त्याने पकडलेला झेल अनेकांनी हंगामातील आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट झेल असल्याचं म्हटलं आहे. राहुलने घेतलेल्या विराटच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हंगामातील सर्वोत्कृष्ट कॅच

सामन्याबद्दल बोलायचे तर विराटच्या आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 204 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात, केकेआर गोलंदाजीनंतर बॅटने देखील कमाल करण्यात अपयशी ठरली. विशाल धावसंख्याचा पाठलाग करणारे कोलकाता नाईट राइडर्स 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 166 धावाच करू शकली आणि आरसीबीने पहिल्यांदा विजयाची हॅटट्रिक करत इतिहास रचला.