IPL 2021 Points Table: आयपीएल 14 च्या युएई लेगची उत्सुकता, पाहा कोणता संघ प्ले-ऑफच्या वाटेवर
रिषभ पंत आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 यंदा मे महिन्यात अनेक फ्रँचायझींमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणानंतर स्थगित करण्यात आली होती. तथापि टी-20 लीग आता 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे पण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates). गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात युएई (UAE) लेगच्या पहिल्या सामन्यात टक्कर होणार आहे. तसेच दुबई अबू धाबी आणि शारजाह आता आयपीएल (IPL) 2021 चे उर्वरित सामने आयोजन करतील. युएई लेग दरम्यान प्लेऑफ आणि फायनल सामन्यासह एकूण 31 सामने खेळले जाणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी भारतात आयोजित ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि अशी शक्यता आहे की काही चाहते आयपीएल 2021 पॉईंट्स टेबलवरील (IPL Points Table) संघाच्या स्थितीबद्दल विचार करत असतील. अशास्थितीत आज आपण इंडियन प्रीमियर लीग 14 च्या गुणतालिकेबद्दल जंणून घेणार आहोत आणि पाहूया की नक्की कोणते संघ प्ले-ऑफच्या वाटेवर आहेत. (IPL 2021: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ‘या’ 3 कर्णधारांवर असणार प्रचंड दबाव, विजेतेपदाच्या शर्यतीत दाखवावा लागणार आपला दम)

गेल्या आयपीएलमधील उपविजेते दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांनी प्रत्येकी आठ सामने खेळले आहेत तर उर्वरित संघांनी सात सामने खेळले आहेत. संघ संघाच्या क्रमवारीत दिल्ली अव्वल स्थानी आहे, तर सनरायझर्स हैदराबाद अवघ्या एका विजयासह तळाशी बसलेले आहेत. ते निश्चितपणे यूएईच्या लेग दरम्यान अधिक सामन्यात विजय मिळवू पाहत असतील. दरम्यान, तुम्ही खाली पूर्ण अपडेट केलेले IPL 2021 पॉईंट टेबल पाहू शकता.

Teams P W L Points Nrr
दिल्ली  कॅपिटल्स 8 6 2 12 0.547
चेन्नई सुपर किंग्स 7 5 2 10 1.263
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 7 5 2 10 -0.171
मुंबई इंडियन्स 7 4 3 8 0.062
राजस्थान रॉयल्स 7 3 4 6 -0.190
पंजाब किंग्स 8 3 5 6 -0.368
कोलकाता नाईट रायडर्स 7 2 5 4 -0.494
सनरायझर्स हैदराबाद 7 1 6 2 -0.623

यंदा आयपीएलच्या 29 सामन्यानंतर 2021 हंगाम स्थगित होण्यापूर्वी दिल्लीसह टॉप-4 संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचा देखील समावेश आहे. या सर्व संघांना आता युएई येथील आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आपला दबदबा कायम ठेवण्याची गरज आहे जेणेकरून प्लेऑफ फेरीत पोहचण्याचा त्यांचा मार्ग सुकर होईल.दिल्ली कॅपिटल्सने  जवळजवळ प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे आणि त्यांना अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सहा सामन्यांमधून फक्त एक विजय आवश्यक आहे. दरम्यान, आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यापुरी अनेक खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघांनी आपापल्या संघात काही बदल केले आहेत. त्यामुळे टी-20 लीग पुन्हा सुरु झाल्यानंतर संघ कसे प्रदर्शन करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.