IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मुंबई इंडियन्सला भिडणार; शिखर धवनचा संघाला मोलाचा सल्ला
शिखर धवन (Photo Credit: PTI)

आयपीलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Delhi Capitals Vs Mumbai Indians) आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंमबरम मैदानावर (MA Chidambaram Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. परंतु, सामना सुरु होण्याआधीच दिल्लीचा समालीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सने या हंगामातील तिन्ही सामने चेन्नईच्या मैदानात खेळले आहेत. याचा फायदा मुंबईच्या संघाला होऊ शकतो. यामुळे या सामन्यात दिल्लीच्या संघाने मुंबई विरोधात मानसिकता आणि आक्रमकताने खेळणे गरजेचे आहे, असे शिखर धवन म्हणाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या सोशल मीडिया चॅटवर बोलताना शिखर म्हणाला की, मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईच्या मैदानावर 2-3 सामने खेळला आहे. या मैदानात खेळत असताना त्यांना अधिक फायदा मिळू शकतो. यामुळे दिल्लीच्या संघाला या सामन्यात मानसिक तयारी करावी लागणार आहे. याशिवाय, मुंबई विरोधात आक्रमकताने खेळावे लागणार आहे, असे शिखर धवन म्हणाला आहे. हे देखील वाचा- Hardik Pandya ने IPL मध्ये Mumbai Indians सोबत खेळतानाच्या 6 व्या वर्षपूर्ती निमित्त शेअर केली खास पोस्ट

दिल्ली कॅपिटल्सचे ट्वीट-

या हंगामात दिल्ली आणि मुंबईच्या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही संघाने 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभव पत्कारला आहे. यामुळे दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. आयपीएलच्या मागील हंगामात दिल्ली आणि मुंबई यांच्यात 4 सामने खेळले गेले होते. या चारही सामन्यात मुंबईचा बोलबाला दिसला. मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीला पराभूत करून पाचव्यांदा आयपीएलचा खिताब जिंकला आहे.