MI vs CSK IPL 2021 Match 27: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) El Clasico सामना 14 व्या आवृत्तीतील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना ठरला. सलग पाच सामन्यात विजयानंतर सहाव्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईचा विजय रथ रोखण्यात अखेर गतविजेत्या मुंबईला यश मिळाले. मुंबई इंडियन्सने 3 वेळाच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा 34 धावांनी पराभव केला. मुंबईच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू कीरोन पोलार्डने (Kieron Pollard) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलार्डने 34 चेंडूत नाबाद 87 धावांची तुफानी खेळी केली जमध्ये 6 चौकार आणि 8 षटकरांचा समावेश होता. याआधी, पोलार्डने गोलंदाजीने 2 विकेट्सही काढल्या होत्या. या सामन्यात माजी ऑस्ट्रेलियन ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. (CSK Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या पराभवाला जबाबदार कोण? चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने केले स्पष्ट)
हॉगने सोशल मीडियाद्वारे एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांनी क्रिकेटमध्ये फलंदाजांना जास्तीचा फायदा मिळत असल्याचं म्हण्टलं आहे. डावातील अखेरच्या चेंडूवर मुंबईला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता होती. लुंगी एनगीडी चेन्नईकडून अखेरचा चेंडू टाकत असताना नॉन-स्ट्राइकला उभा असलेला धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) धाव घेण्यासाठी क्रीझच्या पुढे खूप पुढे गेला होता. त्याच घटनेचा फोटो करताना हॉगने लिहिले की, “पुन्हा तीच गोष्ट म्हणत असल्याची माफी असावी. रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला 2 धावांची आवश्यकता होती. नॉन स्ट्राइकला उभा असलेल्या फलंदाजाने याचा फायदा घेतला होता आणि क्रिजच्या बाहेर उभा होता. हे योग्य आहे का?” असा प्रश्न हॉग यांनी उपस्थित केला.
Sorry again for my harp. Last night last ball 2 runs needed and the non striker again taking advantage. Is this in the spirit of the game. #IPL2020 #MIvsCSK pic.twitter.com/HDEwqfSclg
— Brad Hogg (@Brad_Hogg) May 2, 2021
दरम्यान, या सामन्यात पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले जे आयपीएल 2021 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. पोलार्डने 8 षटकार व 6 चौकारांच्या मदतीने 34 चेंडूत नाबाद 87 धावांची वादळी खेळी करत मुंबईला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. मुंबईविरुद्ध चेन्नईने पहिले फलंदाजी करून 218 धावांचा विशाल डोंगर उभारला पण पोलार्डच्या वादळी खेळीपुढे तो फिका पडला. दुसरीकडे, मुंबईचा पुढील सामना आता 4 मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आह तर चेन्नई सुपर किंग्सची गाठ 5 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी असेल.