IPL 2021, DC vs RR: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध झालेल्या 36 व्या आयपीएल सामन्यात दिल्लीने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर रॉयल्सला 33 धावांनी धूळ चारली. या विजयासह DC ने आयपीएल गुणतालिकेत (IPL Points Table) पुन्हा वरच्या पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा 10 सामन्यातील हा आठवा विजय असून त्यांनी एकूण 16 गुणांसह अंतिम-चारमध्ये निश्चित केला आहे. दिल्लीने दिलेल्या 155 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थान 20 ओव्हरमध्ये 121 धावाच करू शकला. परिणामी संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. रॉयल्ससाठी कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) झुंझार 70 धाव ठोकल्या. तसेच महिपाल रोमरोरने 19 धावा केल्या. दुसरीकडे, एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान, आर अश्विन, अक्षर पटेल आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Kartik Tyagi Dismisses Shikhar Dhawan: दिल्लीविरुद्धही चमकला कार्तिक त्यागी, ऑरेंज कॅप धारक शिखर धवनला पहिल्या चेंडूवर माघारी धाडले)
राजस्थानचा कर्णधार सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय रॉयल्सच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला आणि दिल्लीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. प्रत्युत्तरात लिअम लिविंगस्टोन आणि यशस्वी जयस्वालची जोडी सलामीला उतरली. पण पहिल्याच ओव्हरमध्ये आवेश खानने लिविंगस्टोनने एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये जयस्वाल माघारी परतला. चौथ्या स्थानावर बढती मिळालेला डेविड मिलरही प्रभावी खेळी करू शकला नाही. सॅमसनने 7 धावा केल्या. रोमरोरसोबत सॅमसन डाव सावरण्याचा प्रयत्न करत असताना रबाडाने त्याला माघारी धाडलं. कर्णधार सॅमसन अखेरीस तग धरून खेळत राहिला पण संघाला विजयीरेष ओलांडून देण्यास अपयशी ठरला.
यापूर्वी राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचे दर्शन घडवले आणि दिल्लीला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन सकारियाने 4 षटकांमध्ये प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. याशिवाय दिल्लीसाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावा केल्या.