रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2021 CSK vs MI Match 30: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामाचे मध्यांतर झाले आहे आणि जगभरातील सर्वात मोठी टी-20 लीग परतली आहे. भारतात स्पर्धेच्या पूर्वाधानंतर युएई येथे आयपीएलच्या (IPL) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने आले आहेत. दुबई (DubaI) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला. धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेता आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी आजच्या सामन्यात किरोन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघ विजयाने पूर्वाधाची सुरुवात करू इच्छित असतील. अशा स्थितीत चेन्नई आणि मुंबईने तंगड्या खेळाडूंची फौज मैदानात उतरवली आहे. दुखापतीने ट्रस्ट असलेला फाफ डु प्लेसिस खेळण्यासाठी फिट आहे. तो रुतुराज गायकवाड सोबत सलामीला उतरेल. (IPL 2021 CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्जला नंबर 1 बनण्याची संधी, मुंबईची ‘पलटन’ आरसीबीला टाकू शकते मागे)

आजच्या सामन्यात चेन्नईसाठी वाईट बातमी म्हणजे सॅम कुरन खेळत नाही आहे. कुरन बुधवारी युएईमध्ये दाखल झाल्यामुळे त्याला सहा दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. चेन्नईकडे मोईन अली आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. दुसरीकडे, मुंबईला सर्वात मोठा झटका बसला आहे. कर्णधार रोहित दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत क्विंटन डी कॉक सलामीसाठी ईशान किशन येण्याची शक्यता आहे. तसेच किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या संघाचे मुख्य अष्टपैलू आहेत. हार्दिक पांड्या देखील आजचा सामना खेळत नाही आहे. अशा स्थितीत मुंबई संघात दोन बदल झाले आहेत. सौरभ तिवारी परतला असून अनमोलप्रीत सिंहने मुंबईकडून पदार्पण केले आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी किवी ट्रेंट बोल्ट आणि भारताच्या जसप्रीत बुमराहवर असेल. राहुल चाहर आणि कृणाल संघाचे फिरकी गोलंदाज आहेत. लक्षात घ्यायचे म्हणजे युएईच्या मैदानांवर फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्वाची असेल.

पाहा चेन्नई आणि मुंबईचा प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स XI: एमएस धोनी (कॅप्टन), फाफ डु प्लेसिस, रुतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेझलवूड.

मुंबई इंडियन्स XI: किरोन पोलार्ड (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, अॅडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, आणि ट्रेंट बोल्ट.