IPL 2021: आयपीएलसाठी ‘थाला’ एमएस धोनी, अंबाती रायुडूचे चेन्नईत आगमन; ‘या’ दिवसापासून CSK कॅम्पला होणार सुरुवात
एमएस धोनी (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) 8 किंवा 9 मार्चपासून आपलं शिबिर सुरू करणार आहेत, अशी पुष्टी सीएसकेचे (CSK) मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी गुरुवारी दिली. आयपीएल (IPL) 2020 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) चेन्नई येथे पोचले आहेत आणि तमिळनाडूचे अन्य खेळाडू लवकरच या शिबिरात सहभागी होणार आहेत. ANIशी बोलताना सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन म्हणाले की, आयपीएलच्या आगामी हंगामासाठी 8 किंवा 9 मार्चपासून शिबिर सुरु करण्याचा संघ विचार करीत आहे. “आम्ही आयपीएलच्या आगामी आवृत्तीची तयारी करण्याच्या दृष्टीने आठ व 9 मार्चपासून आमचा कॅम्प सुरू करणार आहोत. कर्णधार महेंद्र सिंह धोनी येथे आहे आणि अंबाती रायुडूसह सर्व उपलब्ध असलेले खेळाडू या शिबिराचा भाग असतील. आम्ही संघात सहभागी असलेल्या तामिळनाडूच्या खेळाडूंकडेही लक्ष देत आहोत,” ते म्हणाले. (IPL 2021: महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संख्येने BCCIच्या चिंतेत वाढ, प्लेऑफ ‘या’ आयोजन करण्याबद्दल विचार)

मिनी लिलावापूर्वी धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने हरभजन सिंह, केदार जाधव, मुरली विजय आणि पियुष चावला यांना संघातून मुक्त केले होते. आयपीएलच्या मागील हंगामानंतर निवृत्त झालेला शेन वॉटसनदेखील यंदा येलो जर्सीमध्ये झळकणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडू व्यतिरिक्त इतर कोणत्याही परदेशी खेळाडूला संघातून सोडण्यात आले नाही. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात चेन्नईने मोईन अली आणि के गौथाम या दोघांना खरेदी केले. शिवाय, आगामी आयपीएल 2021 साठीचेतेश्वर पुजारालाही त्यांच्या संघात स्थान देण्यात आले. मागील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईस्थित फ्रँचायझीने निराशाजनक कामगिरी केली होती. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश अपयशी ठरला तर गुणतालिकेत सातव्या स्थानावर राहिला. सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे आयपीएल 2020 चा हंगामाला मुकला. सीएसकेने तीन वेळा आयपीएल जिंकला असून टी -20 इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रॅंचायझी म्हणून ओळखली जाते.

आयपीएल 2021 साठी चेन्नई सुपर किंग्ज संघ: एमएस धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम असिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एनगीडी, मिचेल सॅटनर, मोईन अली, के गौथम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगथ वर्मा, हरी निशांत, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, जोश हेजलवुड, आर साई किशोर.