रिषभ पंत आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Playoff Race: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात नुकताच यंदाचा 43 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकतर्फी सामना रंगला. बेंगलोरने या सात विकेट्सच्या विजयासह हंगामातील त्यांचा सातव्या विजयासह सलग दुसऱ्या प्लेऑफच्या दिशेने पाऊल उचलले आहे. आयपीएलच्या (IPL) यंदाच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या तीन संघात स्थान मिळवून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि आरसीबी (RCB) संघांनी प्लेऑफ फेरीचे जवळपास तिकीट निश्चित केले आहे. चेन्नई सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दिल्ली आणि बेंगलोरने अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत. तसेच आता चौथ्या स्थानासाठी तब्बल चार संघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. (IPL 2021 Points Table Updated: राजस्थानविरुद्ध दमदार विजयाने RCB प्लेऑफ नजीक, RR साठी मार्ग खडतर)

गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचे 11 सामन्यात एकूण 10 गुण असून ते चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. याशिवाय पंजाब किंग्स व राजस्थान यांचे एकूण 8 गुण आहेत. राजस्थान सातव्या स्थानावर असून त्यांच्यासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर आहे. त्यांच्याकडे अजून तीन सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये मोठ्या फरकाने विजय त्यांना एकूण 14 गुण मिळवून देईल. मात्र परंतु कोलकाता, मुंबई आणि पंजाब यांनी देखील त्यांचे उर्वरित सामने गमावल्यास रॉयल्ससाठी सर्व शक्य होऊ शकते. तथापि सध्य स्थिती पाहता कोलकाता, मुंबई आणि पंजाब यांच्यापैकी एक संघ टॉप-4 मध्ये प्रवेश करताना दिसत आहे. लक्षात घ्यायचे म्हणजे नाईट रायडर्सचा नेट रनरेट मुंबई आणि पंजाबच्या तुलनेत सकारात्मक आहे. कोलकाताला उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकणे गरजेचे आहेत. तर मुंबईसाठी आता उर्वरित तीनही सामने ‘करो-या मरो’चे ठरतील. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव करत आयपीएल 2021 गुणतालिकेत 5 व्या स्थानावर झेप घेतली.

दुसरीकडे, आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे 11 सामन्यात 8 गुण आहेत आणि प्लेऑफ स्पॉट पुन्हा एकदा त्यांच्या हातातून निसटताना दिसत आहे. ते अद्यापही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत परंतु फक्त काही अंतराने. उर्वरित 3 सामन्यांमध्ये प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. उर्वरित सामन्यांमध्ये, पंजाबचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि चेन्नई सुपर किंग्जशी (सीएसके) होणार आहे. अशा स्थितीत आता प्लेऑफच्या शर्यतीती कोणता संघ अंतिम बाजी मारतो हे पाहणे मनोरंजक होणार आहे. दरम्यान चेन्नई, दिल्ली आणि बेंगलोर प्लेऑफपासून आता फक्त एक विजय दूर आहेत.