टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज हनुमा विहारी अनसोल्ड ठरला आहे, तर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन 20 लाखाच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.
IPL 2021 Auction Highlights: Arjun Tendulkar मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, हनुमा विहारी अनसोल्ड


भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला त्याच्या बेस प्राईसवर म्हणजेच 20 लाख रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्सने ताफ्यात घेतलं आहे.

ऑस्ट्रेलियमी मॅथ्यू वेड आणि श्रीलंकेचा थिसारा परेरा दोघेही अनसोल्ड राहिले आहेत. वेडची 1 कोटी तर परेराची 20 लाख अशी बेस प्राईज होती.

चेन्नई सुपर किंगचा माजी अष्टपैलू केदार जाधवला लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सनरायझर्स हैदराबादने 2 कोटींच्या बेस प्राईसवर ताफ्यात समावेश केला. दुसरीकडे, त्याचा माजी साथीदार हरभजन सिंहला केकेआर 2 कोटींच्या बेस प्राईसवर संघात सामील केले.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेम्स निशमला पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सने 50 लाखच्या बेस प्राईसवर खरेदी केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा टी -20 क्रिकेट स्पेशालिस्ट डॅनियल ख्रिश्चन याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 4.80 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह गोट्यात समावेश केला आहे. ख्रिस्चन 75 लाख बेस प्राईससह लिलावाच्या मैदानात उतरला होता.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मोईसेस हेनरिक्सला पंजाब किंग्सने 4.2 कोटीमध्ये खरेदी केलं आहे.

मागील वर्षाची आयपीएल उपविजेते दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंचा चा अष्टपैलू टॉम कुरन याला 5.25 कोटी रुपयात खरेदी केले.
.@DelhiCapitals bring England's @TC59 on board for INR 5.25 Cr. 👌👌@Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/s2uvVfPdv6
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021

न्यूझीलंड फलंदाज मार्टिन गप्टिल आणि भारतीय गोलंदाज पवन नेगी लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांना आपल्या ताफ्यात घेण्यास कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबूशेन आयपीएल लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरला. लाबूशेनची बेस प्राईस 1 कोटी होती.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज Kyle Jamieson याच्यासाठी पंजाब-बेंगलोरमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेरीस आरसीबीने बाजी मारली आणि किवी गोलंदाजासाठी 15 कोटी रुपये मोजले.

भारतीय संघाचा 'टेस्ट स्पेशलिस्ट' चेतेश्वर पुजाराचे आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे. पुजारा 2014 नंतर पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळले. पुजाराला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाखच्या बेस प्राईसवर खरेदी केले.

दिल्ली कॅपिटल्सने एम सिद्धार्थला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे तर मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या पदरी निराशा पडली आहे आणि तो अनसोल्ड राहिला आहे. त्याची बेस प्राईज 20 लाख होती.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज Riley Meredith याला पंजाब किंग्सने 8 कोटी रुपयांच्या बोलीमध्ये संघात सामील केले आहे. त्याने 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दौऱ्यातून लिस्ट ए पदार्पण केले.

Uncapped चेतन साकारियाचा राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 20 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात समावेश केला.

मोहम्मद अझरुद्दीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आरसीबीने अझहरुद्दीनला 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केले.

कर्नाटक अष्टपैलू के. गौतमला कोलकाता नायर रायडर्स टीमने 9 कोटी 25 लाख रुपयांत खरेदी केले.

तामिळनाडूचा शाहरुख खान 2021 हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना दिसेल. 20 लाख बेस प्राईस असलेल्या शाहरुखला पंजाबने 5.25 कोटी रुपयात खरेदी केले. त्याची बेस प्राईज ही एकूण 20 लाख होती.
Shahrukh Khan earns big and how! 👍
He joins @PunjabKingsIPL for INR 5.25 Cr. @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/uHcOJ7LGdl— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शानदार फलंदाजी करणाऱ्या बरोडाच्या विष्णू सोलंकी पहिल्या फेरीत खरेदीदार मिळाला नाही आणि अनसोल्ड राहिला. सोलंकीची बेस प्राईस 20 लाख आहे.

Uncapped खेळाडूंचा लिलाव सुरु झाला असून रजत पाटीदार आणि सचिन बेबीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 20 लाख कोटी रुपयात खरेदी केलं आहे.

आयपीएलच्या 2021 हंगामासाठी अनुभवी भारतीय फिरकीपटू पियुष चावला याला मुंबई इंडियन्सने 2.40 कोटी रुपयात खरेदी केलं. चावलाने मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले होते.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नॅथन कोल्टर-नाईलला 5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

वेस्ट इंडिज वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल, भारतीय फिरकीपटू हरभजन सिंह आणि अफगाणिस्तान फिरकीपटू मुजीब-उर रहमान पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले. त्यांना घेण्यासाठी कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही.

उमेश यादव आता आयपीएलच्या 14व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार. आरसीबीने रिलीज केलेल्या उमेशला दिल्लीने 1 कोटीमध्ये खरेदी केले.

ऑस्ट्रेलियन Jhye Richardson साठी दिल्ली, पंजाब आणि बेंगलोरमध्ये झुंज पाहायला मिळाली, पण अखेरीस पंजाब किंग्सने बाजू मारली आणि 14 कोटी रुपयात त्याचा समावेश केला. रिचर्डसनची बेस प्राईस 1.50 कोटी होती.

राजस्थानने बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला 1 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

न्यूझीलंडचा गोलंदाज अॅडम मिल्ने याच्यासाठी मुंबई इंडियन्सने 3.2 कोटी रुपये मोजले. त्याची बेस प्राईज 50 लाख इतकी होती.

अॅलेक्स कॅरी, सॅम बिलिंग्ज आणि कुसल परेरा अनसोल्ड चेन्नईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील नंबर एक फलंदाज डेविड मलान याला पंजाब किंग्सने 1.50 कोटी रुपयात खरेदी केले.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला. मॉरिससाठी मुंबई आणि राजस्थान संघात चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेरीस रॉयल्सने त्याला सर्वाधिक 16.25 कोटी रुपयात खरेदी केले.

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामासाठी भारतीय अष्टपैलू शिवम दुबे आता राजस्थान रॉयल्सकडून खेळेल.

इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू मोईन अलीला तीन वेळा आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्सने 7 कोटी रुपयांत आपल्या संघात घेतलं. मोईनसाठी चेन्नई आणि पंजाब किंग्स यांच्यात चढाओढ पाहायाला मिळाली.

आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने 14 कोटी रुपयात बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनचा संघात समावेश केला.

चेन्नई सुपर किंग्सचा माजी अष्टपैलू केदार जाधवला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पहिल्या फेरीत कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही. जाधवची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलु ग्लेन मॅक्सवेल आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा भाग बनला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या RCB ने मॅक्सवेलला 14.25 कोटींच्या मोठ्या रकमेसह खरेदी केले.

आयपीएलचे मुख्यप्रायोजकत्व हे पुन्हा VIVO ला देण्यात आलं आहे. भारत-चीन सीमेवरील वाढलेल्या तणावानंतर विवोसोबत 2020 मध्ये करार स्थगित करण्यात आला होता.

आयपीएलच्या 14 व्या सत्रासाठी अॅलेक्स हेल्स, जेसन रॉय आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचला यांना पहिल्या फेरीत खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखविला नाही.

राजस्थान रॉयल्सकडून रिलीज केल्यावर ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथना दिल्ली कॅपिटल्सच्या रूपात नवीन संघ मिळाला आहे. दिल्ली संघाने स्मिथला 2.20 कोटी रुपयात खरेदी केले.

भारतीय फलंदाज करुण नायरला लिलावात नाही मिळाला खरेदीदार. नायरची बेस प्राईस 50 लाख रुपये आहेत.
IPL 2021 Auction LIVE Updates: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 साठी खेळाडूंच्या लिलावाला चेन्नई येथे सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सर्व आठ आयपीएल टीम सहभागी होत आगामी 14व्या सीझनसाठी 291 खेळाडूंवर बोली लगावणार आहेत. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे मात्र, यंदा स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये होण्याची शक्यता आहे. या लिलाव प्रक्रियेत बरेच मोठे खेळाडू सहभागी झाले आहेत, ज्यांच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानेही आयपीएलच्या 14व्या सत्रात नोंदणी केली आहे. या व्यतिरिक्त सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा डेविड मलान, जेसन रॉय यांचाही आहेत. टॉम बंटनसह बरेच अनुभवी आणि खेळाडू देखील लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. (IPL 2021 Auction Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 14 लिलावाचे TV Telecast फ्री पहा Star Sports आणि Disney+Hotstar वर)
लिलाव यादीत 164 भारतीय, 125 परदेशी आणि सहयोगी देशांतील तीन खेळाडूंना स्थान मिळाले. आज 291 खेळाडूंचे भवितव्य निश्चित होणार आहे. पंजाब किंग्सकडे लिलावासाठी सर्वाधिक 53.20 पैसे शिल्लक आहेत तर लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सर्वाधिक 13 जागा भरायच्या आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलचे गेतविजेते असून स्पर्धेची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. अंबानीच्या मालकीच्या मुंबईने 5 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत तर, चेन्नई सुपर किंग्सने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.
संबंधित बातम्या