IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पुढील आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. मिनी-लिलाव असूनही काही कारणांमुळे याबद्दल बरेच काही बोलले जात आहे. सर्वप्रथम, आयपीएल (IPL) 2021 मध्ये लीगचे भारतात पुनरागमन होईल आणि दुसरे म्हणजे, प्रत्येक फ्रँचायझी त्याच्या घरी खेळू शकणार नाही कारण बोर्ड ज्या काही ठिकाणी स्पर्धा आयोजित करेल फक्त अशाच ठिकाणी सामने खेळले जातील. आयपीएल 2021 मध्ये मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) 6 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर लीगमध्ये पुनरागमन करताना पहिले जाऊ शकते. आयपीएल 2021 साठी लिलावाची (IPL Auction) प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी आपण अशा 3 खेळाडूंचा जाणून घेणार आहोत जे यंदा 10 कोटी जॅकपॉट मारू शकतात. (IPL 2021: MS Dhoni याची रेकॉर्ड-ब्रेक कमाई, आयपीएलमध्ये 150 कोटी कमावणारा CSK पहिलाच खेळाडू; रोहित शर्मा, विराट कोहली 'या' स्थानावर)
ग्लेन मॅक्सवेल
आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करण्यात अपयशी असतानाही, जेव्हा लिलावात प्रवेश केला तेव्हा प्रत्येकवेळी मॅक्सवेलने कोट्यवधी रुपयांचे करार मिळवला आहे. आणि यावर्षी देखील, इतिहास स्वत: ची पुनरावृत्ती करू शकेल कारण ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने मोठे आर्थिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएल 2020मध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या मॅक्सवेलचा अलीकडील फॉर्म दुर्लक्षित करण्यासारखा नाही आणि फ्रँचायझी पुन्हा एकदा जोखीम घेत त्याच्या दहा कोटी रुपयांची बोली लावू शकते. टी-20 लीगमध्ये त्याने यापूर्वी 49 कोटींची कमाई केली आहे.
मिचेल स्टार्क
आयपीएल 14 च्या लिलावात सर्वाधिक बोली मिळवण्याच्या सर्वोच्च दावेदारांपैकी एक, स्टार्कने यंदा लिलावात प्रवेश केल्यास 10 कोटींचा आकडा पार करू शकतो. 2015 पासून आयपीएल फिक्स्चर न खेळताही स्टार्कची आयपीएलची 2018 च्या लिलावात मोठी मागणी पाहायला मिळाली आणि कोलकाता नाईट रायडर्सने 9.4 कोटी रुपयात खरेदी केले. दुखापतीमुळे स्टार्क खेळला नाही आणि त्यानंतर स्टार्कने लिलावातही भाग घेतला नाही. मात्र, यंदा भारतात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार असल्याने स्टार्कची स्पर्धेत खेळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे, या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने लिलावात भाग घेतल्यास तगडी रक्कम मिळवू शकतो.
डेविड मलान
इंग्लंडचा नंबर एक टी-20 फलंदाजाची यंदा लिलावात मागणी असू शकते. अनके संघाना योग्य सलामी फलंदाजाची गरज असल्याने मलान फ्रँचायझींकडून बोली आकर्षित करू शकतो. मागील काही वर्षात त्याने स्वत: ला जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज म्हणून स्थापित केले आहे. त्याचा स्ट्राइक रेट 149.47 आणि सरासरी 53.43 हे सर्व जगापलीकडे आहे. त्याने 223 टी-20 मध्ये 33.24 च्या सरासरीने 6177 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट जवळजवळ 130 आहे. अशी आकडेवारी पाहता मालन संभवतः सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असू शकेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.