IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या आवृत्तीस सुरुवात होण्यापूर्वी मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium) आणखी दोन ग्राउंड स्टाफ आणि एक प्लंबर कोविड-19 (COVID-19) पॉसिटीव्ह आढळले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) सूत्रांनी मंगळवारी याची खातरजमा केली. वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंडस्टॅफचे सदस्य आयपीएल (IPL) सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी घरी प्रवास करणार नाहीत आणि स्टेडियममध्येच राहतील असेही समोर आले आहे. “सोमवारी कोविड-19 अहवालात आणखी दोन ग्राउंड स्टाफ सदस्य आणि एक प्लंबर सकारात्मक आढळले आहेत. यापूर्वी वानखेडे येथे दहा ग्राऊंडस्टाफ सदस्यांना कोविडची सकारात्मक लागण झाली होती,” एमसीएच्या सूत्रांनी मंगळवारी एएनआयला सांगितले.
IPL 2021: 2 more groundstaff, one plumber test positive for Covid-19 at Wankhede
Read @ANI Story | https://t.co/kDVKDCGoVU pic.twitter.com/70wWqYhnmb
— ANI Digital (@ani_digital) April 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)