#DhoniKeepTheGlove: ग्लोव्ह्ज काढण्याच्या ICC च्या आदेशानंतर नेटकऱ्यांचा महेंद्रसिंग धोनी याला पाठिंबा
MS Dhoni (Photo Credits- Twitter)

आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 (ICC Cricket WorldCup 2019) मधील दक्षिण आफिक्रेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजयी सलामी दिली. या सामन्यातील विजयात हिटमॅन रोहित शर्माचे नाबाद शतक, युजवेंद्र चहलची दमदार बॉलिंग महत्त्वपूर्ण ठरली. त्याचबरोबर या सामन्यामुळे महेंद्रसिंग धोनी चांगलाच चर्चेत आला आहे.

धोनीच्या ग्लोव्ह्जवर असलेल्या पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या ग्लोव्ह्जच्या वापराबद्दल महेंद्रसिंग धोनीचे प्रचंड कौतुक केले. मात्र हे ग्लोज धोनीने वापरु नयेत, असे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले आहेत. आसीसीच्या या आदेशावरुन नाराज असलेल्या नेटकऱ्यांनी हे ग्लोव्ह्ज धोनीने पुढील सामन्यातही वापरावेत, असा आग्रह केला आहे. नेटकऱ्यांचा हा आग्रह इतका जबरदस्त आहे की #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्विटरवर सध्या टॉप ट्रेडींगला आहे. हे ग्लोज वापरण्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

पहा नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रीया:

यापूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील शेवटच्या सामन्यामध्ये सर्व भारतीय खेळाडूंनी विशेष आर्मी कॅप्स घातल्या होत्या.