IND vs USA T20 WC 2024 Live Streaming: भारत-अमेरिका टी-20 मध्ये प्रथमच आमनेसामने, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
IND vs USA (Photo Credit - X)

IND vs USA T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 25 वा (T20 World Cup 2024) सामना बुधवारी भारत आणि अमेरिका (IND vs USA) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा सामना खेळताना दिसणार आहेत. सलग दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे. तथापि, अमेरिकेला हलके घेणे धोक्याशिवाय राहणार नाही. अलीकडेच त्यांनी सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना कुठे पाहावा लागणार सामना? या लेखाद्वारे आपण जाणून घेवू...

कुठे होणार सामना?

टी-20 विश्वचषक 2024 मध्ये, भारत आणि अमेरिका यांच्यातील महान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

कधी होणार सामना?

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना बुधवार, 12 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे, जो सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार हा सामना भारतात रात्री आठ वाजता सुरू होईल.

टीव्हीवर सामना कुठे प्रसारित केला जाईल?

भारतात, टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.

मोबाईलवर 'फ्री' लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?

डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि अमेरिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.

टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

अमेरिका: मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), आंद्रेस गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नॉस्तुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शेल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.

राखीव: गजानंद सिंग, जुआनो ड्रेसाडेल, यासिर मोहम्मद.