India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team Live Telecast: भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ (IND W vs WI W) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. दुसरा सामना आज 17 डिसेंबर रोजी मंगळवारा डीवाय पाटील स्टेडीयमवर (Dr DY Patil Stadium) खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना खेळवला जाणार आहे. महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर व्हाईटवॉशला सामोरे जावे लागल्याने टीम इंडीया वेस्ट इंडिज विरुद्ध चांगील कामगिरी करेल अशी आशा आहे. संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. (हेही वाचा:ZIM vs AFG 1st ODI 2024: अफगाणिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना मुसळधार पावसामुळे रद्द; 9.2 षटकांचाच खेळ झाला)
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first in the 2nd #INDvWI T20I
Updates ▶️ https://t.co/msHanvwQsI@IDFCFIRSTBank pic.twitter.com/bydSyzQKRO
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष (विकेटकीपर), राघवी बिस्ट, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिज संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शामीन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शाबिका गझनबी, झैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.