दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

India vs South Africa 2nd Test Live Streaming: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज, 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडियाने (Team India) मालिकेतील पहिला सामना 113 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परीस्थितीत यजमान दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकून मालिकेत आपले आव्हान कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या सामन्यात विजयासाठी 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघ दुसऱ्या डावात अवघ्या 191 धावांवर गारद झाला आणि टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी विजय नोंदवला. सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास सातव्या गगनाला पोहोचला असून ते आता पूर्ण आत्मविश्वासाने मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारत विरुद्ध दक्षिण जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (India Predicted Playing XI vs SA 2nd Test: जोहान्सबर्ग कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये होऊ शकतो एक मोठा बदल, पाहा कोण होणार आउट)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धातास आधी म्हणजेच दुपारी 1:00 वाजता होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकतात. हिंदी-इंग्रजीशिवाय इतर प्रादेशिक भाषांमध्येही सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. तसेच Disney+ Hotstar वर वर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. जोहान्सबर्गमधील द वांडरर्स स्टेडियमबद्दल बोलायचे तर टीम इंडियाचा येथे मोठा रेकॉर्ड आहे. 1992 पासून खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांपैकी भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील संघ

भारताचा कसोटी संघ: विराट कोहली (कॅप्टन), प्रियांक पांचाल, केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ : डीन एल्गर (कॅप्टन), टेंबा बावुमा, कगिसो रबाडा, सारेल एरवी, बी हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, के. पीटरसन, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, काइल व्हेरिन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिचेल्टन, डुआन ऑलिवर.