India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. (IND vs BAN T20I Series 2024) पहिला सामना ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पणाची संधी दिली आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना बांगालेदशने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Arshdeep Singh scalps the final wicket of the innings with a perfect yorker! 🔥🔥
Bangladesh are all out for 127.
Scorecard - https://t.co/Q8cyP5jXLe#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gkbiizbI9A
— BCCI (@BCCI) October 6, 2024
प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने तीन षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या आहेत. अर्शदीप सिंगने लिटन दास (4) आणि परवेझ (8) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वरुण चक्रवर्तीने तौहीदला बाद केले. तौहीद 18 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.
पदार्पणाच्याच सामन्यात मयंक यादवने महमुदुल्लाला (1) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वरुणने जाकर अलीला क्लीन बोल्ड केले. 25 चेंडूत 27 धावा करून कर्णधार नझमुल शांतो वॉशिंग्टनचा बळी ठरला. रिशाद हुसेनला (11) बाद करून वरुणने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. तस्किन धावबाद झाला, तर हार्दिकने शरीफुल इस्लामला क्लीन बोल्ड केले.