Ind Vs Aus 5th ODI 2019: ऑस्ट्रेलिया संघाची एकदिवसीय मालिकेत बाजी, 3-2 ने जिंकली मालिका
India Vs Australia Delhi ODI 2019 (Photo Credits: Twitter)

 India Vs Australia Delhi ODI 2019: फिरोजशहा कोटला दिल्ली (Feroz Shah Kotla, Delhi ) येथील स्टेडियम वर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामना रंगला. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी 2-2 जिंकल्यानंतर आज 'आर या पार'ची लढाई होती. मात्र ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर 35 धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यासोबतच ऑस्ट्रेलिया संघाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. संघामध्ये कोणताच दिग्गज खेळाडू नसताना ऑस्ट्रेलियाने ही मालिका दिमाखदार अंदाजात जिंकली. भारताच्या दौऱ्यात T20 सामन्यासोबतच एकदिवसीय मालिका देखील ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली आहे.

टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया संघ मैदानात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. उस्मान ख्वाजाने दमदार शतक ठोकलं. ऑस्ट्रेलिया संघाने 273 धावांचे लक्ष्य ठेवले. या टप्प्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची जादू चालली नाही. अडखळत झालेल्या भारताच्या सुरुवातीमुळे कोणीच फलंदाज फार कमाल करू शकला नाही. परिणामी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.