Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे खेळली गेलेली चौथी कसोटी अनिर्णित राहिली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे या सामन्याचा निकाल कळू शकला नाही. पण हा सामना अनिर्णित राहिल्याने टीम इंडियाने (Team India) सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर (Border-Gavaskar Trophy 2023) कब्जा केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सामना अनिर्णित ठेवण्यास सहमती दर्शवली. अशा प्रकारे टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाने पहिले दोन कसोटी सामने जिंकले, तर तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि चौथी कसोटी अनिर्णित राहिली.

भारताने चौथ्यादां जिंकली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी

भारत आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाने जिंकल्या आहेत. या काळात भारताने ऑस्ट्रेलियात मालिकाही जिंकली आहे. त्याचवेळी या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर जड दिसली. (हे देखील वाचा: Virat Kohli Viral Video: अहमदाबादमधील चौथ्या कसोटीदरम्यान विराट कोहली गंमतीत म्हणाला- 'आज मी विमान उडवणार', पहा व्हायरल व्हिडिओ)

टीम इंडियाने 2017 मध्ये मालिका 2-1 ने जिंकली होती

टीम इंडियाने 2019 मध्ये मालिका 2-1 ने जिंकली होती

टीम इंडियाने 2021 मध्ये मालिका 2-1 ने जिंकली होती

टीम इंडियाने 2023 मध्ये मालिका 2-1 ने जिंकली होती

अशी कामगिरी करणारा भारत ठरला आशियातील पहिला संघ

ऑस्ट्रेलियाला सलग चार कसोटी मालिकेत पराभूत करणारा टीम इंडिया हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. तर भारताने घरच्या मैदानावर सलग सहाव्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. त्याचवेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले.

WTC ची फायनल ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणार

विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. जिथे ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संघ पुन्हा एकमेकांशी भिडतील.