ICC WTC 2021-23 Points Table: हेडिंग्ले टेस्ट पराभवाचा टीम इंडियाला जोरदार झटका, पाकिस्तानने काबीज केले ‘अव्व्ल’ स्थान
इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी जिंकली आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथे स्थान कायम ठेवले आहे. लीड्स कसोटीच्या पराभवाचा भारतीय संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत देखील जोरदार फटका बसला आहे आणि पाकिस्तानने अव्वल स्थान काबीज केले आहे.
ICC WTC 2021-23 Points Table: इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team) भारताविरुद्ध (India) पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी जिंकली आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत चौथे स्थान कायम ठेवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंड संघाने भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभूत करत मालिकेतील तिसरी कसोटी सामना जिंकला. अशास्थितीत लीड्स कसोटीच्या (Leeds Test) पराभवाचा भारतीय संघाला (Indian Team) टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत देखील जोरदार फटका बसला आहे आणि पाकिस्तानने (Pakistan) अव्वल स्थान काबीज केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 ची सुरुवात झाली आणि दोन्ही संघांमधील नॉटिंगहम येथे आयोजित पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यानंतर लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक लढा दिला आणि कसोटी सामना 151 धावांनी जिंकला. (IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्ट सामन्यात टीम इंडियाला भारी पडल्या ‘या’ 4 चुका, पहिल्या दिवशीच लिहिला गेला होता पराभव)
आता तिसऱ्या कसोटीत इंग्लिश खेळाडूंनी कडवी झुंज दिली आणि एक डाव व 76 धावांनी जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या विजयानंतर इंग्लंड संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यडचं गुणतालिकेत चौथ्या स्थानावर बसला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर घसरली आहे आणि पाकिस्तान आता गुणतालिकेत आघाडीवर पोहचला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, टीम इंडियाला मोठा धक्का बाळा आणि पहिल्या दिवशी अवघ्या 78 धावांवर संपूर्ण टीम पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 354 धावांची मोठी आघाडी मिळण्यास मदत झाली. इंग्लिश कर्णधार जो रूटने सामन्यात यजमान ब्रिटिश संघासाठी शानदार शतक झळकावले आणि टीम इंडियावर तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेतली.

दरम्यान, मालिकेची चौथी कसोटी आता 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान लंडनच्या द ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. शिवाय मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आहे आणि पुढील कसोटी जिंकणारा संघ मालिकेत विजयी आघाडी घेईल. त्यामुळे चौथी टेस्ट मॅच नक्कीच रंगतदार होईल. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनला पहिल्या तीन सामन्यातून वगळणे टीम इंडियासाठी मोठ्या चिंतेचे कारण बनले आहे. अशास्थितीत चौथ्या कसोटी सामन्यात तरी टाइम इंडिया अश्विनला संधी देते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2021 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

