ICC U19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, सलामीचा सामना द.अफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये; स्पर्धेबद्दल जाणून सर्व काही तपशील
U-19 World Cup 2024 (Photo Credit - Twitter)

ICC U19 World Cup 2024: आजपासून दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील विश्वचषकाला (ICC U-19 World Cup 2024) सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज (SA vs WI) यांच्यात ब्लूमफॉन्टेन येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे खेळवला जाईल. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 16 संघांमध्ये 5 ठिकाणी खेळवली जाईल. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला विलोमूर पार्कवर खेळवला जाईल. वर्ल्ड कपमध्ये एकूण 41 सामने होणार आहेत. विश्वचषकाचा हा 15वा मोसम आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती, परंतु नोव्हेंबरमध्ये बंदी घातल्याने आयसीसीने श्रीलंकेकडून यजमानपद काढून घेतले. (हे देखील वाचा: IND vs BAN ICC U19 World Cup 2024 Live Streaming: अंडर-19 विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना तुम्ही येथे पाहू शकता थेट, सामन्याची अचूक वेळ जाणून घ्या)

16 संघांची 4 गटात करण्यात आली विभागणी 

यावेळी अंडर-19 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. 4 गटात 16 संघ सहभागी होणार आहेत. गटातील अव्वल 3 संघ सुपर-6 साठी पात्र ठरतील. सुपर 6 मध्ये प्रत्येकी 6 संघांचे दोन गट तयार केले जातील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघांमध्ये उपांत्य फेरी होईल आणि अंतिम सामना दोन विजेत्या देशांदरम्यान खेळवला जाईल.

भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध

या स्पर्धेतील पहिला सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 जानेवारी रोजी जेबी मार्क्स ओव्हलवर खेळवला जाईल. तर भारताचा पहिला सामना बांगलादेशशी 20 जानेवारीला मेगॉन्ग ओव्हलवर होणार आहे. या स्पर्धेत भारत बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका यांच्याविरुद्ध गट टप्प्यातील 3 सामने खेळणार आहे. तिन्ही सामने फक्त मेगॉन्ग ओव्हलवर खेळवले जातील.

भारत गतविजेता म्हणून प्रवेश करेल

ही स्पर्धा आतापर्यंत 14 वेळा खेळली गेली असून, भारत गतविजेता आहे. भारतीय संघाने शेवटचा 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. भारताकडे सर्वाधिक 19 वर्षाखालील पुरुषांचे विजेतेपद (5) आहेत. ऑस्ट्रेलियाने 3 वेळा तर पाकिस्तानने 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड सारखे अव्वल संघ प्रत्येकी एकदाच उपविजेते बनू शकले आहेत.