LSG vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 57 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आज 8 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सशी (LSG vs SRH) भिडणार आहे. या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. सनरायझर्स हैदराबादने 11 सामने खेळले आहेत आणि 6 जिंकले आहेत, तर पाचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत हा संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, परंतु एक सामना गमावल्यास संघ टॉप-4 मधून बाहेर पडू शकतात आणि पुनरागमन करणे कठीण होईल. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी संमिश्र झाली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने देखील 11 सामने खेळले आहेत आणि 6 विजय आणि 5 पराभवांसह सहाव्या क्रमांकावर आहे. लखनौच्या संघाने हैदराबादला पराभूत केल्यास ते टॉप-4 मध्ये स्थान मिळवेल आणि प्लेऑफचा मार्ग थोडा सोपा होईल.
दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
या मोसमात प्रथमच दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात 3 सामने खेळले गेले आहेत. लखनौ सुपर जायंट्सने सर्व सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादला एकही सामना जिंकता आलेला नाही. आयपीएलच्या गेल्या मोसमात दोघांमध्ये दोनदा संघर्ष झाला होता. लखनौ सुपर जायंट्सने पहिला सामना 5 विकेटने तर दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. आयपीएल 2022 मध्ये फक्त एकच सामना खेळला गेला, ज्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने 12 धावांनी विजय मिळवला. (हे देखील वाचा: LSG vs SRH IPL 2024 Live Streaming: आज हैदराबाद आणि लखनौ यांच्यांत होणार प्लेऑफसाठी लढत, कधी अन् कुठे पाहणार सामना लाइव्ह? घ्या जाणून)
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबादछ: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
लखनौ सुपरजायंट्स: केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), अर्शिन कुलकर्णी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान.