राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: Instagram)

RR vs KXIP 9th IPL Match 2020: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या नवव्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आमने-सामने येतील. आयपीएलमधील आजचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये (Sharjah Cricket Stadium) खेळला जाईल. आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघांच्या आजवरच्या कामगिरीबाबत बोलायचे तर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे तर स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्याच सामन्यात गतवर्षीचे उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभूत करून मोसमाची विजयी सुरुवात केली. (RR vs KXIP, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदा आयपीएलचा 13 वा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे, पण जर आपणस काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकता. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:

1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.

2. नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकता.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.