IPL 2021: आयपीएलच्या 14व्या हंगामात किती संघ खेळताना दिसणार? महत्वाची माहिती आली समोर
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम समाप्त होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. आयपीएलची स्पर्धा अधिक आकर्षित करण्यासाठी या लीगमध्ये आणखी दोन नव्या संघाची जोडणी करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयकडे करण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पुढील हंगामात केवळ आठ संघालाच सहभाग घेणार येणार, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच आयपीएल 2022 मध्ये आठहून अधिक संघ खेळण्याची शक्यता आहे. त्यावेळी मोठा लिलाव होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात आला होता. या हंगामातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपटल्सला पराभूत करून मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आयपीएलचा पुढील हंगाम अधिक आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेत आणखी दोन संघ जोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात केवळ आठ संघालाच खेळता येणार आहे. त्यानंतरच नव्या संघाचा समावेश करण्यासाठी लिलाव केला जाणार आहे. यामुळे आयपीएलच्या पंधराव्या हंगमात 10 संघ खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- भारतात परतण्यापूर्वी विराट कोहली याने बोलावली खास मिटिंग; संघातील युवा खेळाडूंना केले मार्गदर्शन

कोरोना संकटामुळे मार्चमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा नोव्हेंबरमध्ये पार पडली आहे. दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामाला जास्त काळ राहिला नसल्याने अनेक संघ चौदाव्या हंगामाच्या मेगा लिलावाच्या विरोधात होते. या संदर्भात अंतिम निर्णय  24 डिसेंबरला बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत होणार आहे.