IPL 2024 Prize Money List: आयपीएल 2024 च्या चॅम्पियन टीमवर किती कोटींचा पडणार पाऊस? बक्षीस रकमेचे तपशील येथे घ्या जाणून
CSK (Photo Credit - X)

IPL 2024 Prize Money List: आयपीएल 2024 च्या (IPL 2024) हंगामाची तयारी आता पूर्ण झाली आहे आणि सर्व संघ मैदानात उतरून चॅम्पियन बनण्यासाठी आपली ताकद दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. या मालिकेतील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. चेन्नई संघाला विक्रमी सहाव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनायचे आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा मैदानात उतरून आरसीबीला पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यास मदत करेल. दरम्यान, बीसीसीआय आयपीएल 2024 च्या मोसमात बक्षिसाची रक्कम कशी वितरित करणार आहे ते जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IPL 2024: आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात 10 जेतेपद पटकावणाऱ्या दोन दिग्गजांना का सोडावं लागलं कर्णधारपद, घ्या जाणून)

गेल्या हंगामात किती पैसे मिळाले

आयपीएल 2023 सीझनबद्दल बोलायचे तर बीसीसीआयने चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपये दिले होते. याशिवाय उपविजेत्या गुजरातला 13 कोटी रुपये मिळाले. बीसीसीआयने अद्याप आयपीएल 2024 सीझनच्या बक्षीस रकमेबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही, परंतु असे मानले जाते की बक्षीस रक्कम तशीच राहणार आहे. यामुळे आयपीएल 2024 हंगामातील चॅम्पियन संघाला 20 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघाला 7 कोटी रुपये तर चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएल बक्षीस रकमेचा तपशील खालीलप्रमाणे आहे

विजेता - 30 कोटी

उपविजेता - 13 कोटी

पात्रता - 8 कोटी

एलिमिनेटर - 7 कोटी

इतर श्रेणी बक्षीस रक्कम

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - 15 लाख

पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट) - 15 लाख

इमर्जिंग खेळाडू - 20 लाख

मोस्ट वैल्युबल खेळाडू - 12 लाख

सुपर स्ट्रायकर - 15 लाख

पॉवर प्लेयर - 12 लाख

सर्वाधिक षटकार - 12 लाख

गेम चेंजर - 12 लाख