IPL 2025: आयपीएल 2025 च्या 11 व्या सामन्यात शेवटच्या षटकाचा थरार पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (RR VS CSK) यांच्यातील सामन्यात धोनीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. शेवटच्या षटकात धोनीने (MS Dhoni) आपली विकेट गमावली तेव्हा हा सामना सीएसके चाहत्यांसाठी विडयी ठरला. ज्यामुळे सीएसके विजयापासून फक्त 6 धावा दूर राहिले. धोनीची विकेट पडताच अनेक चाहत्यांची मने दुखावली गेले. ज्यामध्ये एका चाहत्या मुलीची संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरला. चेन्नईच्या संघाला शेवटच्या षटकात फक्त 20 धावांची आवश्यकता होती. एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने आपल्या फलंदाजीने सामन्यात जीवंतपणा आणला. माहीने जबरदस्त चौकार आणि एक शानदार षटकार मारला आणि संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. पण धोनीने त्याची बॅट फिरवली आणि सीमारेषेवरील क्षेत्ररक्षकाने एक शानदार झेल घेतला.

त्या फॅन गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती धोनीच्या शॉटमधून उडणाऱ्या चेंडूवर लक्ष ठेवून आहे. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने सीमारेषेवर एक शानदार झेल घेतला आणि धोनीला बाद केले.