कोरोना विषाणू (coronavirus) संकटामुळे भारतामध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता देशातील कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) ला महिला टी-20 चॅलेंजची (Women's T20 Challenge) यंदाची एडिशन रद्द करावी लागू शकते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या आवृत्तीच्या प्लेऑफ टप्प्यात ही तीन संघांची स्पर्धा खेळली जाणार होती. कोरोना विषाणूच्या साथीमुळे बीसीसीआय यावर्षी या टी-20 स्पर्धेचे आयोजन न करण्याचा विचार करीत आहे, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी खेळाडू सहभागी होतात.
एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेता महिला स्पर्धा आयोजित करणे खूप अवघड आहे. परंतु याबाबत अजून अधिकृत निर्णय झाला नाही. परंतु दुर्दैवाने ही स्पर्धा रद्द होण्याची दाद शक्यता आहे.' कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे गोष्टी खूप कठीण झाल्या आहेत. प्रवास प्रतिबंध आणि उड्डाण निर्बंधामध्ये परदेशी खेळाडूंना घेऊन स्पर्धेचे आयोजन करणे सोपे होणार नाही. सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेस नेहमीच प्राधान्य दिले जाईल त्यामुळे, कदाचित पुढील सत्रामध्ये यंदाचे एडिशन होस्ट केले जाईल.
दुसरीकडे अशा अनेक बातम्या आल्या आहे की, बर्याच परदेशी खेळाडूंना, विशेषत: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ही स्पर्धा सोडायची आहे. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हो गोष्ट नाकारली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका स्रोताने एएनआयला सांगितले की, ‘संपूर्ण स्पर्धा होईपर्यंत स्पर्धेत सहभागी राहण्याची खेळाडूंची इच्छा आहे. माध्यमांनी ज्या बातम्या दिल्या आहेत त्या पूर्णतः चुकीच्या आहेत.’
आयआयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांनी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांना विश्वास दिला आहे की, लीगच्या शेवटी बीसीसीआय त्यांचे सुरक्षित परत जाणे सुनिश्चित करेल. मात्र, याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलच्या सद्य सत्रातून आपली नावे मागे घेतली आहेत. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना हे आश्वासन दिले आहे की बोर्ड त्यांच्यासोबत आहे.