Ranbir Kapoor and Aamir Khan (Photo Credits: @Dream11/X)

फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम11 त्याच्या सर्जनशील जाहिरातींसह क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. नुकताच त्यांचा आयपीएल 2025 बाबत एक नवा प्रोमो लॉन्च झाला. ज्यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आमिर खान (Aamir Khan), क्रिकेट आयकॉन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्य कुमार यादव (Surya Kumar Yadav) यांचा समावेश पाहायला मिळतो. या प्रोमोमुळे अनेकांना प्रश्न पडला आहे हा जितेंद्र भाटवडेकर कोण? (Who is Jitendra Bhatawadekar?)

व्हायरल ड्रीम11 च्या जाहिरातीत काय आहे?

आयपीएल 2025 पर्वातील या जाहिरातीमध्ये रणबीर आणि आमिर त्यांच्या ड्रीम11 प्लेइंग इलेव्हनपैकी कोणता खेळाडू अधिक ताकदवानआहे? यावर एकमेकांची गंमत करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करत लक्ष वेधून घेताना रोहित शर्माने अनपेक्षितपणे एका अज्ञात क्रिकेटपटूचे नाव जितेंद्र भाटवडेकर असे ठेवले आहे. जे ऐकूण आमिर खान, गोंधळलेला दिसतो, तर सूर्य कुमार यादव देखील गोंधळलेला दिसतो. रोहित नंतर कबूल करतो की तो खेळाडू पूर्णपणे काल्पनिक आहे, ज्यामुळे आमिर आणि सूर्या आश्चर्यचकित होतात. (हेही वाचा, Rajiv Gandhi Stadium Pitch Stats and Records: आयपीएल 2025 चा दुसरा सामना SRH विरुद्ध RR यांच्यात होणार, राजीव गांधी स्टेडियमचे खेळपट्टी पहा)

सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रोहित शर्माच्या प्रश्नामुळे सोशल मीडिया चांगलाच भरात आला. वापरकर्त्यांनी या प्रोमेवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. लॉन्च झाल्यानंतर पुढच्या काहीच क्षणांमध्ये हा प्रोमो आणि जाहीरात चांगलीच व्हायरल झाली. वापरकर्त्यांनी ड्रीम11 च्या विनोदी मार्केटिंग आणि बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटर्समधील केमिस्ट्रीचे कौतुक केले.

ड्रीम11 चा नवीन आयपीएल 2025 चा प्रोमो

दरम्यान, ड्रीम11 ने मनोरंजक आयपीएल प्रोमो तयार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी या आधीही अशा मजेशीर कल्पना वापरल्या आहेत. ज्यामुळे चाहत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी क्रीडा, विनोद आणि स्टार पॉवर यांचे मिश्रण करण्याची त्यांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

आयपीएल 2025 पर्वाची  सुरुवात आज, 22 मार्च 2025 रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होणाऱ्या पहिल्या सामन्याने होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30  वाजता सुरू होणार आहे. ही स्पर्धा 25 मे 2025 पर्यंत चालेल, ज्यामध्ये भारतातील विविध ठिकाणी एकूण 74 सामने खेळवले जातील.