Rishabh Pant (Photo Credit - X)

DC vs CSK, IPL 2024, Match 13: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. परंतु त्यांचा कर्णधार ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंतची ही पहिलीच चूक असल्याने त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, दिल्लीच्या कर्णधाराला आता थोडे लक्ष द्यावे लागेल कारण अशी चूक आणखी दोनदा झाल्यास त्याला एका सामन्यासाठी निलंबित केले जाऊ शकते.

पंतच्या आधी गिललाही दंड ठोठावण्यात आला होता

आयपीएलच्या या हंगामात कर्णधाराला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गुजरातचा कर्णधार शुभमन गिललाही चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. भविष्यात अशी चूक करू नये, असा इशाराही शुभमनला देण्यात आला. (हे देखील वाचा: MS Dhoni Clicks Picture With Ground Staff: एमएस धोनीने विझाग ग्राउंड स्टाफसोबत काढला फोटो, व्हिडिओ व्हायरल)

आयपीएलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला रविवारी वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन करण्याचा हा संघाचा पहिलाच गुन्हा असल्याने पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.