DC प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिला गुरु मंत्र, टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम
रिकी पॉन्टिंग (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सीझन 14 च्या दुसऱ्या भागात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या (Australian Cricketers) खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. व ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) प्रशिक्षक रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) मात्र त्याच्या देशातील खेळाडूंना आयपीएल (IPL) 14 च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना पाहायचे आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयपीएल आऊट ऑफ फॉर्म ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसाठी एक आदर्श तयारी असेल असे मत कांगारू संघाचे माजी कर्णधार पाँटिंग यांनी म्हटले आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहेत, तर टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धा यूएई येथे खेळल्या जातील. (IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात SRH साठी खेळणार डेविड वॉर्नर? माजी सनरायझर्स कर्णधाराने इंस्टाग्राम पोस्टसह दिला मोठा इशारा)

पाँटिंग म्हणाला, “जे खेळाडू तीन किंवा चार महिने खेळले नाहीत, त्यांना जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध क्रिकेट खेळून लयमध्ये येण्याची गरज आहे.” आयपीएल खेळल्याने विश्वचषकासाठी खेळाडूंची तयारी सुधारेल, असे रिकी पाँटिंगचे मत आहे. ते म्हणाले, “टी-20 विश्वचषक आता फार दूर नाही (पण) युएईमध्ये तंदुरुस्त आणि निरोगी सर्वांसोबत, मला अजूनही वाटते की ऑस्ट्रेलियन संघ हे विजेतेपद जिंकण्यासाठी खरोखरच जोरदार प्रयत्न करू शकतात ज्याने आम्ही वंचित राहिलो आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सर्वोत्तम तयारी असेल यात शंका नाही, त्यांना जगातील सर्वात मजबूत घरगुती टी-20 स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल.” ऑस्ट्रेलियन फलंदाजीने मुख्य आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर तसेच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हे पहिल्या पसंतीच्या खेळाडूंपैकी आहेत ज्यांनी अलीकडच्या वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यांतुन माघार घेतली होती.

दरम्यान, जगातील अव्वल क्रमांकाचा वेगवान गोलंदाज कमिन्स मात्र आयपीएल 14 च्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडू शकतो. सप्टेंबरमध्ये कमिन्स पहिल्यांदा वडील होणार आहेत आणि याच कारणामुळे तो विंडीज आणि बांगलादेश दौऱ्यातूनही बाहेर पडला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच त्याच्या खेळाडूंना आयपीएल 14 च्या उत्तरार्धात सामील होण्याच्या समर्थानात नाही. फिंचने यापूर्वी म्हटले होते की थकवा व क्वारंटाईन नियमांचा हवाला देत राष्ट्रीय कर्तव्याबाहेर गेलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे औचित्य साधणे कठीण होईल.