DC Vs MI, IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रोहीत शर्माने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करणार
रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मुंबई इंडियन्सशी (Delhi Capitals Vs Mumbai Indians) भिडणार आहे. चेन्नईच्या (Chennai) एम. चिदंमबरम मैदानात (MA Chidambaram Stadium) आज (20 एप्रिल) सायंकाळी 7.30 वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. एकीकडे शेवटच्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. तर, दुसरीकडे मुंबईने सनराईजर्स हैदराबादवर विजय मिळवला होता. हे देखील वाचा- DC vs MI Dream 11 Prediction: काय तुम्ही ड्रीम 11 गेम खेळतात? मग दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात 'हे' खेळाडू बदलू शकतात तुमचे नशीब

ट्वीट-

संघ-

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेटमीयर, ललित यादव, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, अमित मिश्रा, अवेश खान

मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट