दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 229 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 228 धावा करून केकेआरला (KKR) डोंगराएवढं आव्हान दिलं, पण केकेआरला विकेट गमावून 210 धावांपर्यंतच मजल मारता आली. आयपीएलमधील (IPL) पहिल्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि कोलकाता आमने-सामने आले होते. केकेआरकडून नितीश राणाने (Nitish Rana) 58, शुभमन गिल 28, आंद्रे रसेल 13, इयन मॉर्गनने धावा केल्या. केकेआरकडून डेथ ओव्हरमध्ये इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) फटकेबाजी केली, पण टीमला विजय मिळवून देण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही. मॉर्गन 44, राहुल 36 धावा करून माघारी परतला. दरम्यान, आजच्या विजयाने दिल्लीने गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थान गाठले. (DC vs KKR, IPL 2020: पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचा तडाखा! दिल्लीने KKRला दिले 229 धावांचे आव्हान)

केकेआरकडून पुन्हा शुभमन आणि नारायण यांनी डावाची सुरुवात केली, पण 8च्या धावसंख्येवर टीमला पहिला झटका बसला. नारायण आजच्या सामन्यात 3 धाव करून माघारी परतला. त्यानंतर शुभमनने नितीश राणाच्या जोडीने डाव पुढे नेला. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली, त्यानंतर शुभमन 28 धावा करून बाद झाला. रसेल देखील निखिलला जास्त काळ साथ देऊ शकला नाही. कगिसो रबाडाच्या ओव्हरमध्ये 1 चौकार आणि षटकार मारून रसेल बाद झाला. रबाडाने पुढच्याच चेंडूवर कर्णधार दिनेश कार्तिकलाही परतीचा रास्ता दाखवला. डेथ ओव्हरमध्ये मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी फटकेबाजी केली. पण दोघे दिल्लीच्या गोलंदाजांवर बरसले. मॉर्गनने राबडाच्या 18व्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार ठोकले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मॉर्गन 44 धावांवर परतला. राहुल त्रिपाठीने 36 धावा केल्या. दिल्लीकडून आजच्या सामन्यात एनरिच नॉर्टजेने 3, हर्षल पटेलने 2 तर अमित मिश्रा, मार्कस स्टोइनिस आणि रबाडा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

यापूर्वी, दिल्लीकडून पृथ्वी शॉने 41 चेंडूत 66 धावा केल्या. रिषभ पंतने अखेरच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करत श्रेयसला मदत केली. पंत 17 चेंडूत 38 धावा करुन माघारी परतला. कोलकाताकडून रसेलने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.