टीम इंडिया (Team India) 2013 पासून आयसीसीची (ICC) एकही मोठी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरली आहे. यादरम्यान, संघाला अंतिम फेरीत आणि उपांत्य फेरीत अनुरकमे 3 वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोस (Curtly Ambrose) म्हणाले की, गेल्या सात वर्षात तीनही स्वरूपात सातत्यपूर्ण कामगिरी करूनही भारत आयसीसीचे जेतेपद जिंकू शकला नाही याबद्दल त्यांना आश्चर्य वाटते. 2013 मध्ये इंग्लंडमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) रूपात टीम इंडियाने अखेरचे आयसीसीचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल आणि शेवटच्या आठवड्यात साऊथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पराभव पत्करावा लागला होता. (IND vs ENG 2021: इंग्लंडमध्ये टीम इंडियाची फलंदाजी अप्रभावी पण Sunil Gavaskar म्हणतात 'कसोटी मालिकेची चिंता करू नका', जाणून घ्या कारण)
आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांच्या सामन्यांमध्ये भारतीय दिग्गज पुन्हा पुन्हा अपयशी ठरत आहेत. कर्टली एम्ब्रोसने युट्यूबवर 'द कर्टली आणि करिश्मा शो' वर सांगितले की, “गेल्या काही काळापासून आयसीसी स्पर्धेतील प्रमुख सामन्यांमध्ये भारताला पराभव सहन करावा लागला आहे, ज्यात फायनल आणि सेमीफायनल फेरीचा समावेश आहे. भारतीय संघाने या काळात खूप चांगले क्रिकेट खेळले आहे, परंतु जेव्हा मोठ्या प्रसंगी चांगले खेळण्याची वेळ येते तेव्हा संघ सतत अपयशी ठरला. मला वाटते की ते या मोठ्या प्रसंगी त्यांचा गेम प्लॅन बदलतात आणि स्वत:वर अधिक दबाव आणतात.” एम्ब्रोजने टीम इंडियाला त्यांच्या योजनांवर ठाम राहण्याचा सल्ला दिला ज्यामुळे त्यांना वेळोवेळी यश मिळेल.
एम्ब्रोसपुढे म्हणाले की, “जर टीम इंडियाच्या सतत पराभवाचे कारण हेच असेल तर ते चुकीचे आहे. माजी खेळाडू म्हणून मी असे म्हणू शकतो की जर तुम्हाला मोठे सामने जिंकण्याची इच्छा असेल तर उर्वरित सामन्यांमध्ये आपण जसे खेळता तसेच खेळा आणि आपल्या उणीवा दूर करा. खेळाची योजना आणि मार्ग बदलू शकत नाही, मग तो सेमीफायनल असो किंवा फायनल सामना असो. आपण सुरुवातीपासूनच जे करीत आहात ते करावे लागेल आणि यश मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे.” दरम्यान, आयसीसी स्पर्धांच्या सेमीफायनल व फायनल सामन्यात टीम इंडियाच्या सतत अपयशामुळे त्यांना नवीन ‘चोकर्स’ म्हटले जात आहे.