मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) आणि वहाब रियाज (Wahab Riaz) यांच्यासह पाकिस्तानचे (Pakistan) सहा क्रिकेटपटूंची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शिवाय, दुसऱ्या कोरोना (Coronavirus) टेस्टचा अहवाल देखील सकारात्मक आल्याने पाकिस्तानच्या संघातील दहा खेळाडूंना इंग्लंड (England) दौर्यासाठी वगळण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी पुष्टी केली. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 29 खेळाडूंपैकी 10 खेळाडूंना कोरोनाची सकारात्मक लागण झाल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) यापूर्वी जाहीर केले होते. पीसीबीने करवलेल्या दुसऱ्या कोरोना टेस्टमध्ये फखर जमान, मोहम्मद हसनैन, मोहम्मद हाफिज, मोहम्मद रिझवान, शादाब खान आणि वहाब रियाज यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. यामुळे आता रविवारी मॅनचेस्टरला जाण्यासाठी 20 खेळाडू, 11 सहाय्यक कर्मचारी रवाना होतील. पीसीबी या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर मधील इंग्लंड दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये 3 टेस्ट आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल.
रविवारी 20 खेळाडू आणि 11सहाय्यक कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानी पथक इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. लागलेल्या खेळाडूंना थोडी आशा देत पाकिस्तान बोर्डाचे मुख्य कार्यकारी वसीम खान म्हणाले की, जर नंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली तर ते पुन्हा संघात सामील होऊ शकतात. हैदर अली, फखर जमान, मोहम्मद रिजवान, शादाब खान, हॅरिस राऊफ, मोहम्मद हसनैन, काशिफ भट्टी, वहाब रियाज, इम्रान खान, मोहम्मद हाफिज असे दहा खेळाडूंना वगळले आहेत. दरम्यान, ज्या सहा खेळाडूंची आता नकारात्मक चाचणी आली आहे त्यांची पुढील आठवड्यात तिसर्या टप्प्याची चाचणी होईल आणि जर त्यामध्ये अहवाल नकारात्मक आला तर पीसीबी त्यांना इंग्लंडमध्ये पाठविण्याची व्यवस्था करेल.
20 players, 11 support staff to travel to Manchester on Sundayhttps://t.co/rjXWqcEc4O https://t.co/9T8Yg1BsVw
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 27, 2020
सर्वाला सुरुवात करण्यापूर्वी पाकिस्तानी टीम 14 दिवसांसाठी क्वारंटाइन होतील. यामध्ये विशेष म्हणजे, पहिल्या टेस्टमध्ये सकारात्मक आढळलेला मोहम्मद हफीजची पीसीबीने केलेली दुसरी टेस्ट नकारात्मक आली. हैदर अली, हरीस रऊफ, काशिफ भट्टी आणि इम्रान खान यांच्यासमवेत मलंग अली यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि आता त्यांना नियमाप्रमाणे क्वारंटाइन राहावे लागणार आहे.