
GT vs CSK IP 2025 67th Match: आयपीएल 2025 मध्ये 67 सामना आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. गुजरातने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहायचे असेल तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्याच वेळी, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीलाही त्याच्या संघाने स्पर्धेचा शेवट विजयाने करावा असे वाटते. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकूण प्रथम फलदांजी करत गुजरातसमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Brevis at the death powers Chennai to their highest total of the season 🔥
🔗 https://t.co/T366RayUY4 | #IPL2025 pic.twitter.com/1w4lvU5peR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 25, 2025
चेन्नई सुपर किंग्जकडून डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. डेव्हॉन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय, शेवटी, डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या स्फोटक खेळीने चेन्नईला 200 च्या पुढे नेले. ब्रेव्हिसने 23 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.
या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली. आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने पहिल्या 3 षटकात 40 पेक्षा जास्त धावा केल्या. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने आयुष म्हात्रेला 44 धावांवर बाद करून चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर, उर्विल पटेल आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. शेवटी, जडेजा आणि देवाल्ड ब्रेव्हिस यांनी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रविश्रीनिवासनने साई किशोर, रशीद खान आणि शाहरुख खानकडून 1-1 बळी घेतले. सध्या, गुजरातला टॉप 2 मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 231 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावात हा सामना आणखी रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.