Shaheen Afridi (Photo Credit - Twitter)

Champions Trophy 2025: यंदा पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले आहे. जरी साखळी सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्याने पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला. आता पाकिस्तान संघाच्या निवडकर्त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) सूचनांचे पालन न केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे तक्रार केली आहे. निवडकर्त्यांनी आफ्रिदीवर स्वतःच्या मर्जीने काम केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) गमावला, असे निवडकर्त्यांचे म्हणणे आहे.India vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 Final: पावसामुळे फायनल रद्द झाली तर कोण जिंकेल? रिझर्व्ह डेचे नियम काय? जाणून घ्या

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, एका अधिकाऱ्याने शाहीनविरुद्ध तक्रार दाखल केली. ज्यामध्ये त्याने सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. अधिकाऱ्याने असा दावा केला की, वेगवान गोलंदाजाने यॉर्कर टाकण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि त्याऐवजी स्वतःच्या मर्जीने गोलंदाजी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी आफ्रिदीला संघातून वगळण्यात आले आहे.

पाकिस्तान टी-20 संघाचा कर्णधार बदलला

न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा एकदिवसीय आणि टी-20 संघ नुकताच जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानच्या टी-20 संघाचा कर्णधार बदलण्यात आला. पाकिस्तानच्या टी-20 संघाची कमान सलमान अली आगा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर मोहम्मद रिझवान एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून कायम राहील. याशिवाय स्टार फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. तर शाहीन आफ्रिदीला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे.