Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, आयसीसी लवकरच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार आहे. मात्र याबाबत काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने फक्त UAE मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ हा सामना दुबईत खेळू शकतो. यासोबतच या स्पर्धेची उपांत्य फेरीही दुबईत होणार आहे. (हेही वाचा - IND Beat SL U19 Asia Cup Semi Final: भारताचा श्रीलंकेवर 7 विकेटने विजय, अंतिम फेरीत टीम इंडियाचा शानदार प्रवेश)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक शनिवारी किंवा रविवारी जाहीर करू शकते. भारतीय संघ दुबईत आपले सामने खेळू शकतो. 2027 साठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे लेखी दिलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी महिला संघ 2025 च्या विश्वचषकात आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळू शकतो. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
तिरंगी मालिकेच्या मागणीवरून पीसीबीला आयसीसीने दिला दणका
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलला अनुसरून तिरंगी मालिकेची मागणी केली होती. भारत आणि पाकिस्तानसह आणखी एका देशाचा समावेश करून तिरंगी मालिका आयोजित करावी, असे ते म्हणाले. मात्र आयसीसीने पीसीबीची मागणी फेटाळून लावली आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, आयसीसी यापुढे पीसीबीला अतिरिक्त निधी देणार नाही. पीसीबीने यासह इतरही अनेक मागण्या केल्या होत्या.
जय शाह ICC चे अध्यक्ष बनले -
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. नुकतीच त्यांनी आयसीसीच्या मुख्यालयालाही भेट दिली. त्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. आयसीसीनेही त्याचे फोटो शेअर केले आहेत. आता त्यांच्या आयसीसीमध्ये रुजू झाल्यामुळे बीसीसीआयमधील सचिवपद सध्या रिक्त आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल आता बीसीसीआयचे आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत.