IND Beat SL U19 Asia Cup Semi Final: भारताचा श्रीलंकेवर 7 विकेटने विजय, अंतिम फेरीत टीम इंडियाचा शानदार प्रवेश
भारताची सुरुवात आक्रमक झाली भारताकडून आयूष म्हात्रे (28 चेंडूत 34 धावा) आणि वैभव सुर्यवंशीने (36 चेंडूत 67 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.
Indian National Under-19 Cricket Team vs Sri Lanka National Under-19 Cricket Team, ACC U19 Asia Cup 2024 Live Score Update: एसीसी अंडर-19 आशिया चषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना आज भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेतन शर्माच्या 3 विकेट आणि वैभव सुर्यवंशीच्या 36 चेंडूत 67 धावांच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर 7 विकेटने विजय मिळवला. या विजयामुळे भारताने अंतिम फेरीत शानदार प्रवेश मिळवला आहे. दरम्यान श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 173 धावांत गारद झाला होता. भारताकडून चेतन शर्माने 8 षटकांत 34 धावा देत 3 विकेट घेतल्या तर किरण चोरमाले आणि आयूष म्हात्रे याने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. (हेही वाचा - Vaibhav Suryavanshi Half Century: बिहारी मुलगा वैभव सूर्यवंशीने श्रीलंकेविरुद्ध ACC अंडर-19 आशिया कप 2024 च्या उपांत्य फेरीत सलग दुसरे अर्धशतक झळकावले)
दरम्यान श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या आठ धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 46.2 षटकांत अवघ्या 173 धावांत गारद झाला. श्रीलंकेसाठी लकविन अबेसिंघेने 69 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान लकविन अबेसिंघेने 110 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. लक्विन अबेसिंघेशिवाय शरुजन षणमुगनाथनने 42 धावा केल्या.
भारताची सुरुवात आक्रमक झाली भारताकडून आयूष म्हात्रे (28 चेंडूत 34 धावा) आणि वैभव सुर्यवंशीने (36 चेंडूत 67 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर अँड्रे सिद्धार्थ 27 चेंडूत 22 धावा करत भारताची धावसंख्या हलती ठेवली. कर्णधार मोहम्मद अमानने देखील 25 धावांची नाबाद खेळी केली आणि भारताचा विजय सुकर केला. या विजयामुळे भारताने अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला आहे. भारताचा अंतिम सामना रविवारी बांग्लादेश सोबत होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2024 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

