Australia National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (SL vs AUS) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 29 जानेवारी (बुधवार) पासून गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम (Galle International Stadium) गॅले येथे खेळला जात. सकाळी 10 वाजल्यापासून सामना खेळला जाईल. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि फक्त 27 षटकांचा खेळ झाला. श्रीलंकेची पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांनी फक्त 30 धावांत तीन विकेट गमावल्या. संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 518 धावांनी मागे आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 654/6 वर घोषित केला. उस्मान ख्वाजाने 232, स्मिथने 141 आणि जोश इंग्लिसने 102 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.(Australia Women vs England Women, Only Test Day 3 Match Preview: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून)
चौथा दिवसाचा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस 1 फेब्रुवारी (शनिवार) रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले येथे खेळला जाईल.
सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल?
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे चाहत्यांना, या सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड अॅप आणि वेबसाइटद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पहायला मिळेल.