ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

AUS vs ENG, Ashes 4th Test: इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) चौथा सिडनी कसोटी (Sydney Test) अनिर्णित राहिली आहे. कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 388 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मालिकेतील पहिला सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या 10 विकेट्सची गरज होती. पण, यजमानांना ना 10 विकेट घेता आल्या, ना पाहुण्यांच्या 388 धावांचा पाठलाग करता आला. अशाप्रकारे सिडनी कसोटीत अनिर्णित निकाल लागला. या सामन्यानंतर ब्रिटिश संघाने अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचे क्लीन स्वीप करण्याचे स्वप्नही भंग झाले आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 4 कसोटी सामन्यांनंतर कांगारू संघ 3-0 अशा आघाडीवर आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीच्या पावसाने प्रभावित झालेल्या 5व्या दिवसाच्या शेवटपर्यंत इंग्लंडचे फलंदाज खेळपट्टीवर लढा देत राहिले.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी एका विकेटची गरज होती, पण जेम्स अँडरसनने दिवसाची अंतिम ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या स्टीव्ह स्मिथ यश मिळू दिले नाही. परिणामी सामना अनिर्णित राहिला. एकूण 102 षटकात इंग्लंडने 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 270/9 वर दुसरा डाव संपवला. पंचांनी पॅट कमिन्सला सांगितले की प्रकाशामुळे ते फक्त शेवटच्या दोन षटकांमध्ये स्पिनर्सनाच गोलंदाजी करू शकतात त्यामुळे नोव्हेंबर 2016 मध्ये अखेर कसोटी विकेट घेणाऱ्या स्टिव्ह स्मिथने तिसरे शेवटचे षटक टाकले. स्मिथने जॅक लीचला बाद करून टेस्ट विकेटचा दुष्काळ संपवला. ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी सहा विकेट्सची गरज असताना अंतिम सत्राची सुरुवात केली, तर इंग्लंड 213 धावा दूर असताना शेवटच्या सत्रात सामना अनिर्णित ठेवण्यासाठी खेळत होता. ब्रिस्बेन, अ‍ॅडिलेड आणि मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध मालिकेतील सुरुवातीच्या तीनही कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. तर सिडनीमध्येही इंग्लंडला झोडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, इंग्लंडच्या शेपटीने त्यांचा विजयाच्या आशा धुवून काढल्या.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना उस्मान ख्वाजाच्या 137 धावांच्या जोरावर 8 बाद 416 धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 294 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 122 धावांची आघाडी मिळाली ज्यानंतर 6 बाद 265 धावा करून दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने पुन्हा शतक झळकावले. अशाप्रकारे, यजमानांना एकूण 387 धावांची आघाडी मिळाली, आणि इंग्लंडला 388 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले. आता मालिकेचा अंतिम सामना होबार्टच्या ब्लंडस्टोन अरेना येथे 14 जानेवारीपासून खेळला जाईल.