इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये सर्व 10 संघांमध्ये एकापाठोपाठ एक शानदार सामने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज या स्पर्धेतील आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर प्रथमच आयपीएल सामना खेळवला जाणार आहे. या स्टेडियमचे उद्घाटन 2012 मध्ये झाले होते. गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. या खेळपट्टीवर खूप धावा केल्या जातात. त्याचबरोबर गोलंदाजांनाही चांगली उसळी मिळते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करू इच्छितो.
सर्वांच्या नजरा या दिग्गजांवर असतील:
जोस बटलर
राजस्थान रॉयल्सचा स्फोटक सलामीवीर जोस बटलरने पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना 54 धावा केल्या.गेल्या सामन्यात तो ऑरेंज कॅपचा मानकरी होता. या वर्षीही जोस बटलरने दमदार सुरुवात केली आहे.
युझवेंद्र चहल
राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल हा अतिशय अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. युझवेंद्र चहल गेल्या मोसमात पर्पल कॅपधारक होता. यावर्षीही चांगली सुरुवात करत त्याने पहिल्याच सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातही युझवेंद्र चहल महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
सॅम करण
KKR विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सॅम करनने अष्टपैलू कामगिरी करताना 26 धावा केल्या आणि 1 बळी घेतला. या सामन्यातही सॅम करन हा पंजाब संघासाठी उत्तम पर्याय असेल. (हे देखील वाचा: IPL 2023 RR vs PBKS, Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या सामना कधी, कुठे आणि कसा बघणार)
अर्शदीप सिंह
पंजाब किंग्ज संघाकडून शेवटच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने 3 बळी घेतले. अर्शदीप सिंग या सामन्यातही चांगली कामगिरी करू शकतो.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात २४ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने 14 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 सामने जिंकले आहेत.आकड्यांवरून राजस्थान रॉयल्स संघाचे पारडे जड दिसते.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, सिकंदर रझा, सॅम कुरान, एम शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.