इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दिल्लीच्या होम ग्राऊंड अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या संघाने या मोसमात सलग 5 सामने गमावले आहेत. अशा स्थितीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर विजयाचे दडपण असेल. दुसरीकडे, दोन सामने गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सलाही विजयी मार्गावर परतायचे आहे. (हे देखील वाचा: DC vs KKR, IPL 2023 Match 28 Live Streaming: दिल्ली आणि कोलकाता यांच्यात आज रंगणार रोमांचक सामना, जाणून घ्या सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार)
सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील
व्यंकटेश अय्यर
गेल्या सामन्यात वेंकटेश अय्यरने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. या स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने आतापर्यंत 234 धावा केल्या आहेत. वेंकटेश अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्ती हा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. वरुण चक्रवर्तीने आपल्या संघाकडून 7 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातही केकेआरच्या संघाला वरुण चक्रवर्तीकडून मोठ्या आशा असतील.
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या स्पर्धेत आतापर्यंत 228 धावा केल्या आहेत. या मोसमात डेव्हिड वॉर्नरने 5 पैकी 3 सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. डेव्हिड वॉर्नर या सामन्यातही चांगली कामगिरी करू शकतो.
अक्षर पटेल
या मोसमात अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आतापर्यंत 128 धावा केल्या आहेत आणि 2 बळी घेतले आहेत. या सामन्यातही अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून एक चांगला अष्टपैलू खेळाडू असल्याचे सिद्ध होऊ शकतो.